Ecole T20 Cup 2024 (Pune) – जय पांढरेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सोलापूर स्टार इलेव्हन संघाने मेव्हिरिक्स क्लब संघाला ७ गडी राखून पराभूत करताना इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इकोल टी-२० करंडक स्पर्धेत विजयी आगेकूच केली.
शिंदे हायस्कूल मैदानावर झालेल्या लढतीमध्ये प्रथम फलंदाजी करताना मेव्हिरिक्स क्लब संघाचा डाव १७.१ षटकांत ८१ धावांमध्ये संपुष्टात आला. जय पांढरेने भेदक गोलंदाजी करताना १६ धावांच्या मोबदल्यात ५ गडी बाद केले. मेव्हिरिक्स संघाकडून शुभम तैस्वालने सर्वाधिक २८ (१ चौकार, २ षटकार) धावांची खेळी केली. कर्णधार हरी सावंत व मयांक कश्यप यांनी प्रत्येकी १६ धावांचे योगदान दिले. बाळकृष्ण काशीद, चेतक गोरे व स्वराज वाळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
सोलापूर स्टार इलेव्हन संघाने ११.१ षटकांत ३ बाद ८२ धावा करताना विजय साकारला. सलामीवीर प्रवीण देशेट्टी ३४ (१ चौकार, ३ षटकार), निरंजन कदम ३३ (६ चौकार), वैष्णव जावळे नाबाद १२ (१ षटकार) यांनी संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. मयांक कश्यप, अक्षय वायकर व संदीप शिंदे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.