Ecole T20 Cup 2024 : सांगली संघाची उपांत्य फेरीत धडक, रिक्रिएशन क्लबवर केली मात…

Ecole T20 Cup 2024 : – अस्लम शेखने केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघाने (एसडीसीए) रिक्रिएशन क्लब संघावर ८ गडी राखून मात करताना इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इकोल टी-२० करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
शिंदे हायस्कुल मैदानावर झालेल्या लढतीमध्ये रिक्रिएशन संघाचा डाव अस्लम शेखच्या भेदक गोलंदाजीसमोर १४. १ षटकांत सर्वबाद ८१ धावांवर संपुष्टात आला. रिक्रिएशन संघाकडून श्रेयस जीवनेने सर्वाधिक २४ (४ चौकार) धावांची खेळी केली. शुभम मानेने २३ (३ चौकार, १ षटकार), अथर्व दातारने १० (१ चौकार, १ षटकार) धावांचे योगदान दिले. अस्लम शेखने १८ धावांच्या मोबदल्यात ४ तर तरणजीतसिंग धिल्लोनने १३ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले हितेश वाळुंजने २ तर सुशील बुरलेने १ गडी बाद केला.
एसडीसीए संघाने केवळ ८.१ षटकांत २ बाद ८५ धावा करताना विजय साकारला. यश नहारने २८ (३ चौकार, २ षटकार), सोमेश गस्तेने नाबाद ३२ (३ चौकार, १ षटकार) धावा करताना संघाला विजय मिळवून दिला. शुभम माने व आदिनाथ गायकवाड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
Ecole T20 Cup 2024 : राजस्थान रॉयल्स अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश….
उपांत्य फेरीचे सामने….
१) राजस्थान रॉयल्स अकादमी वि. मेव्हिरिक्स अकादमी
२) अष्टपैलू स्पोर्ट्स वि. एसडीसीए (सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन)





