Satara | खा. उदयनराजे भोसले यांच्या फंडातून एक कोटी; समाज कल्याणमधून दीड कोटी

नागठाणे, (प्रतिनिधी) – मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नामुळे कराड उत्तरसाठी अडीच कोटींचा निधी आला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील विकासकामांसाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्थानिक विकास निधी मधून एक कोटीचा निधी तर समाज कल्याण विभागाकडून दीड कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे.
या निधीमधून मनोज घोरपडे यांनी १३ गावांमध्ये सुचवलेली विकासकामे केली जाणार आहेत. तसेच समाज कल्याण विभागाकडून दीड कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे.
त्याअंतर्गत कराड उत्तर मधील बारा गावांमध्ये त्याची विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये मसूर ब्रह्मपुरी येथे सावता माळी मंदिर सभा मंडप बांधणे १० लक्ष, हेळगाव येथे नृसिंह मंदिर सभामंडप बांधणे १० लक्ष, अंधारवाडी येथील अंतर्गत रस्ता काँक्रीकरण करणे ७ लक्ष,
शिवडे येथे २ हायमास्ट लाईट बसवणे ३ लक्ष, सोनापूर येथे बागलवस्ती मध्ये सभा मंडप बांधणे १० लक्ष,शिवडे येथे हिराई गार्डन मध्ये अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे ७ लक्ष, कामठी येथे रामोशी वस्ती सभा मंडप बांधणे १० लक्ष, टेंभू येथे अंतर्गत काँक्रीटीकरण करणे ७ लक्ष,
जायगाव येथे उर्वरित सभामंडपाचे काम करणे ५ लक्ष, चोरगेवाडी तेथे सभा मंडप बांधणे प लक्ष , कण्हेरखेड काटेवाडी येथे सभा मंडप बांधणे १२ लक्ष, कोपर्डे येथे सभा मंडप बांधणे १० लक्ष, चोराडे येथील ज्योतिर्लिंग मंदिरासमोर सभा मंडप बांधणे १० लक्ष अशी कामे होणार आहेत.





