Earthquake News : म्यानमार, नेपाळला भूकंपाचे धक्के !
Updated On:

नायपितॉ, काठमांडू – म्यानमार आणि नेपाळला आज भूकंपाचे धक्के बसले. नेपाळच्या मुग्गु येथे भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.४ इतकी मोजली गेली.
याआधी गुरुवारीही बागमती प्रांतातील सिंधुपाल चौकात ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. काल दुपारी काठमांडू खोऱ्यातही भूकंपाचे धक्के जाणवले.
तर म्यानमारमध्ये शुक्रवारी सकाळी ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे. यापूर्वी १४ डिसेंबर रोजी म्यानमारमध्ये ४.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला होता, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले.





