Earthquake : अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के ! नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
Updated On:

Earthquake – अमरावती जिल्हा आज भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. हे धक्के चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सूर्जी तालुक्यातील अनेक भागांत दुपारी दीड वाजताच्या सुमारास जाणवले. यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
मेळघाटचा काही भाग, आमझरी, सातपुड्याच्या पायथ्याचा भाग, चिखलदरा, धारणी तालुक्यातील अनेक भागांत हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.२ इतकी नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नसली, तरी अनेक गावांमध्ये या भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती गावकऱ्यांनी दिले आहे. भूकंपामुळे हानी झाल्याचे अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.





