लडाखमध्ये पुन्हा भूकंपाच धक्के ; भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ इतकी

Earthquake in Ladakh । लडाख या केंद्रशासित प्रदेशात सोमवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसार, हा भूकंप पहाटे ४ वाजून ३२ मिनिटांनी झाला. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पळत सुटले.
पहाटेच्या या भूकंपाचे केंद्र लडाखची राजधानी लेह येथे ३४.३५ उत्तर अक्षांश आणि ७८.०६ पूर्व रेखांशावर, १० किमी खोलीवर होते. स्थानिक लोकांनी सांगितले की, भूकंपाच्या धक्क्यांमुळे ते जागे झाले आणि नंतर ते घराबाहेर पडले. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे अजून तरी वृत्त नाही. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
EQ of M: 3.6, On: 24/03/2025 04:32:58 IST, Lat: 34.35 N, Long: 78.06 E, Depth: 10 Km, Location: Leh Ladakh, Ladakh.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/XX8eaTC0bN— National Center for Seismology (@NCS_Earthquake) March 23, 2025
भूकंपाच्या दृष्टीने लडाख संवेदनशील Earthquake in Ladakh ।
लडाख हे हिमालयीन पर्वतरांगाजवळ वसलेले आहे, त्यामुळे भूकंपाच्या दृष्टीने ते संवेदनशील क्षेत्र मानले जाते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की येथे छोटे भूकंप होणे सामान्य आहे, परंतु मोठ्या भूकंपाचा धोका देखील कायम आहे. यावेळी झालेला भूकंप सामान्य आहे. यावेळीही झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ इतकी होती. अशा भूकंपामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी असते.
भूकंप का होतात? Earthquake in Ladakh ।
पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली नेहमीच अशांतता असते. पृथ्वीच्या आतील प्लेट्स सतत एकमेकांवर आदळत असतात किंवा एकमेकांपासून दूर सरकत असतात. म्हणूनच भूकंप होत राहतात. भूकंप समजून घेण्यापूर्वी, आपण पृथ्वीखालील प्लेट्सची रचना समजून घेतली पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, पृथ्वीवर १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स एकमेकांवर आदळल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला भूकंप म्हणतात.





