प्रभात वृत्तसेवा पिंपरी – रस्त्याच्या कडेला धोकादायकरित्या उभ्या केलेल्या केमिकल टॅंकरला मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. ही घटना पुणे मुंबई महामार्गावर पुनावळे येथे गुरुवारी (दि. २०) पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास घडली.मेजो एम. एम. (वय ४२, रा. मु. पो. वाटाणा तरा, पो. मन्नम पेठा, ता. अम्ब्लुर, जि. त्रिशुल, रा. केरळ) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबत त्यांचा आतेभाऊ संतोष गोपी तोट्टापायी (वय ५३, रा. पोस्ट अवीनीशेरी, जि. त्रिशूर, केरळ) यांनी गुरुवारी याबाबत रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याकूब अली दस्तगीर शेख (वय ४५, रा. बिमाईल, ता. गुलबर्गा, राज्य कर्नाटक) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ३.२० वाजताच्या सुमारास आरोपी याकूब शेख याने केमिकल टँकर महामार्गावर कोणतीही सुरक्षा न बाळगता उभा केला होता. त्यावर मागून फिर्यादीच्या आत्याचा मुलगा मेजो एम.एम. यांचा ट्रक (जोरदार धडकला. अपघातात त्यांचा मृत्यू झाला.