‘पहिले सरकारचा पैसा कब्रस्थानांवर खर्च केला जात होता, आता मात्र मंदिरांवर खर्च होतोय’
Updated On:

अयोध्या – दिपोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जनतेला आणि आपल्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांना संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.
ते म्हणाले,’उत्तर प्रदेशमध्ये विकास दिसतोय. यापूर्वी उत्तर प्रदेशच्या जनतेचा पैसा (सरकारी निधी) कब्रस्थानांच्या भींती बांधण्यासाठी खर्च केला जात होता. मात्र आज हा पैसा मंदिरांचा सुशोभिकरणासाठी अन् पुन:विकास वापरला जातो आहे. यातूनच विचारांमधील फरक दिसून येतो. ज्या लोकांना कब्रस्थानांची काळजी होती त्यांनी त्या ठिकाणी पैसा खर्च केला. ज्यांना धर्म आणि संस्कृतीची चिंता आहे ते सध्या पैसा धर्म आणि संस्कृतीचं जनत करण्यासाठी वापरत आहेत.” असं म्हणत योगींनी सभेत सरकारच्या कामबद्दल सांगितलं





