Nagar | पावसाळ्यात प्लॅस्टिकमुळे तुंबतात ओढे – नाले

नगर (प्रतिनिधी) – बंदी असतानाही बाजारात प्लॅस्टिक कॅरीबॅगचा सर्रास वापर केला जातो. भाजी मार्केट, फळ मार्केट तसेच बाजारपेठेतील विक्रेते ग्राहकांनी मागितल्यानंतर विनादिक्कत कॅरी बॅग देतात.
या प्लॅस्टिकमुळे मोठे प्रदूषण होत आहे. प्लॅस्टिक पिशवी जनावरांच्या पोटात गेल्यानंतर त्यांचा मृत्यू होतो, तर कचऱ्याच्या स्वरूपात फेकलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या ओढे-नाले व गटारींमध्ये अडकले जात असल्याने पावसाळ्यात तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत.
पाणी शासनाने दि. १ जुलै २०२२ पासून निवडक १९ प्रकारच्या एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तूंचेउत्पादन, वितरण, साठा, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. प्लॅस्टिकचा वापर वर्षभरात ७०० किलो करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मनपाच्या कारवाईनंतरही कॅरीबॅगचा वापर सुरू आहेत. विशेषत भाजीबाजारात मोठ्या प्रमाणात बॅग वापरल्या जातात
प्लॅस्टिकमुळे पाणी तुंबते
शहरात सध्या महापालिकेकडून नालेसफाई झाली आहे. यात बहुतांशी कचरा हा प्लॅस्टिकचा निघाला. कचरा संकलनासाठी घंटागाडी येत असली तरी बहुतांशी नागरिक हे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये कचरा भरून ओढे-नाल्यांमध्ये फेकला जातो. नाल्यांची वर्षातून एकदाच सफाई होते.
त्यामुळे हा कचरा नाल्यांमध्ये तसाच पडून राहतो. त्यामुळे शहरातील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. नगर शहरात ओढे-नाल्यांच्या कडेला तसेच थेट प्रवाहात प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये कचरा भरून तो फेकला जातो. हा कचरा महापालिकेच्या यंत्रणेकडून उचलला जात असला तरी यातील बहुतांशी कचरा हा प्रवाहात अडकून राहतो त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो.
मनपाकडून वर्षभरात ७०० किलो प्लास्टिक जप्त
महापालिकेने गेल्या वर्षभरात शहरातील ७८४ आस्थापनांची तपासणी करून प्लास्टिक वापराबाबत २७ आस्थापनानंतर कारवाई केली यामध्ये ७०० किलो प्लस्टिक जप्त करत १ लाख ३५ हजार रुपयांना दंड वसूल केला





