जयपूर – प्रेयसीचे दुसऱ्यासोबत लग्न जमल्याने संतप्त तरूणाने बलात्कार करून प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उदयपूर शहरातील डुंगारपूर येथे घडली. मोनिका (वय 18, आडीवाटी, सागवाडा) असे हत्या झालेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकर मुकेश ननोमा याला अटक केली आहे. ही घटना 3 जानेवारीला उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश आणि मृत मोनिका यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु होते. काही दिवसांपूर्वी मोनिकाचे दुसऱ्यासोबत लग्न जमले होते. त्यानंतर मुकेश तणावात होता. 2 जानेवारीला त्याने मोनिकाला घरी बोलावून शेतात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार करून डोक्यात दगड घालून ठार केले. त्यानंतर मफलरने तिला झाडावर लटकवले. पोलिसांनी मफलरवरून शोध घेतला असता आरोपी मुकेश सापडला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबूली दिली. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.