‘या’ कारणामुळे 27 लाख महिलांच्या खात्यात जमा होणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे

मुंबई : राज्य सरकारची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे. राज्य सरकारे 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आजपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
एकीकडे पैसे जमा होताना दुसरीकडे 27 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. अर्ज अप्रूव्ह झाला तरी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. कारण, या अर्जदार महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही. यामुळे यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. यामुळे त्यांनी आपले खाते आधार कार्डशी लिंक करावे. यानंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.
राज्यात 1 कोटी 40 लाख महिलांची नोंंदणी पूर्ण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत सुमारे 1 कोटी 45 लाख 76 हजार महिलांनी नोंदणी केलेली आहे. आणि त्यातील एकूण 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.





