‘या’ सरकारी प्लॅटफॉर्ममुळे ओला आणि उबेरचा ताण वाढू शकतो, ग्राहकांना मात्र स्वस्तात मिळणार राईड !

मुंबई – सरकारने तयार केलेल्या डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ओएनडीसी (ONDC) बद्दल आजकाल बरीच चर्चा होत आहे. ओएनडीसी हे डिजिटल ई-कॉमर्सच्या जगात एक असे खुले नेटवर्क प्लॅटफॉर्म आहे, जिथे कोणताही दुकानदार सामील होऊ शकतो. इन्फोसिस कंपनीचे सीईओ नंदन नीलेकणी यांच्या मते, ओएनडीसी डिजिटल ई-कॉमर्सच्या जगात लोकशाही वातावरण निर्माण करण्यासाठी काम करेल.
त्यांच्या मते, डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म केवळ काही लोकांपुरते मर्यादित नसावे. प्रत्येक लहान दुकानदार, किराणा विक्रेता, रेस्टॉरंट दुकानदार, इलेक्ट्रॉनिक किरकोळ विक्रेता या खुल्या डिजिटल मार्केटमध्ये सामील होऊ शकतात. युपीआयने ज्या प्रकारे पेमेंटच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे. त्याच प्रकारे, ओएनडीसी देखील डिजिटल ई-कॉमर्सच्या जगात क्रांती आणण्याबद्दल बोलत आहे.
दुसरीकडे, तुम्हाला याबद्दल माहिती आहे का की, जर हे व्यासपीठ यशस्वी ठरले तर आगामी काळात ओएनडीसी ओला आणि उबेर सारख्या कॅब सेवा कंपन्यांचे टेन्शन वाढवू शकते.
अशा परिस्थितीत, ते ओला आणि उबेर या मोबिलिटी सेवा कंपन्यांची जोडी संपुष्टात आणू शकते. अलीकडेच ओएनडीसीने बेंगळुरू आधारित ऑटो बुकिंग अॅप ‘नम्मा यात्री’ अॅपवर ऑन-बोर्डिंग करून एक उत्तम पाऊल उचलले आहे.
ओएनडीसी हे एक ना नफा डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरील कॅब सेवेसाठी तुम्हाला जास्त कमिशन द्यावे लागणार नाही. आगामी काळात परवडणाऱ्या किमतीत ओएनडीसीच्या माध्यमातून कॅब सेवा बुक करता येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
ओएनडीसी म्हणजे काय?
ओएनडीसी (ONDC) हे डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. याचा अर्थ डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क. हे प्लॅटफॉर्म विक्रेता, ग्राहक आणि डिलिव्हरी भागीदार एकत्र जोडते.





