राजेंद्र वाघमारे नेवासा – स्व.गोपीनाथ मुंढे यांचे पुतणे धनंजय मुंढे,शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे मनसे प्रमुख राज ठाकरे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार या राज्यातील पुतण्यांनी राजकारणात बलाढ्य असणाऱ्या काकांना चांगलाच जोर का झटका दिल्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण फुटीर बनले आहे. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी जोर का झटका देवून देशात मोठी राजकिय खळबळ उडवून दिली त्यामुळे आता ग्रामिण भागातील सर्वच पक्षातील राजकारणी नेतेमंडळीही पुतण्या अन् भावांपासून सावध भूमिका घेतांना दिसून येवू लागली आहेत पुढच्याच ठेस मागचे शहाने होत असल्याचे चिञ राज्याच्या फाटा – फुटीमुळे समोर दिसून येवू लागलेले आहे त्यामुळे या राजकारणाचा सद्यपरिस्थितीत चांगलाच खेळखंडोबा झालेला आहे सामान्य जनतेत त्यामुळे आता पक्ष आणि निष्ठा हा प्रकार येथून पुढे थांबण्याची चिन्हे राज्यातील कार्यकर्त्यातून निर्माण झाली असल्याचे सुज्ञ मतदारांतून बोलले जात आहे. लोकशाहीचा मुलभूत हक्क बजावून मतदान रुपी सत्तास्थानावर बसविलेले नेतेच जर जनतेचा विश्वासघात करुन सत्तेत जाण्यासाठी वाटेल तर करु लागल्यामुळे जनतेचा राजकारणावरचा विश्वास उडून सत्ता नाट्याच्या या नविन घडामोडींमुळे नेते चांगलेच गप्पगार पडले आहेत कार्यकर्ते पक्षावर खरी निष्ठा ठेवून सत्तेसाठी पक्ष मतदारांचा विश्वासघात करुन फितूर होत असल्यामुळे जनतेने नेमका विश्वास कोणावर ठेवायचा ? असा सवाल सर्वसामान्य मतदारांतून सध्या चांगलाच चर्चिला जात आहे. सध्याच्या राजकारणात ठाकरे – शिंदे यांची लढाई संपत नाही तेच काका – पुतण्याची पक्षीय लढाई राज्यात सुरु झाल्यामुळे राजकारणात सर्वकाही क्षम्य असते असते असाच निष्कर्ष या निमित्तातून सुज्ञ मतदारांतून निघत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची आगामी काळातील निष्ठा एकसंघ राहीलच असे दिसून येत नाही नेतेच जर सत्तेसाठी काय पण… करु लागले तर सर्वसामान्य कार्यकर्ते याचा नेमका काय बोध घेतील ? त्यामुळे आगामी काळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणात “गुरुवर विद्या” उलटविण्याचा प्रकार समोर आल्याशिवाय राहणार नसल्याचा अंदाजही सुज्ञ मतदार बांधतांना दिसून येत आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर जम बसविलेले आमदार, खासदार,जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आणि सरपंच आतापासूनच आपल्या पुतण्या अन् भावांवर दुरुन डोंगर शोभिवंत करतांना दिसून येत असून पक्ष अन् निष्ठेपेक्षा पुढाऱ्यांपेक्षा मतदारांनाच जीव लागून आपली राजकारणातील आगामी वाटचाल करतांना दिसून येत आहे. भाजपाचे नेते केंद्रिय मंञी स्व.गोपीनाथ मुंढेंचा तो व्हिडीओ मोठा चर्चेत आलेला असून मुंढे म्हणतात मला आणि शिवसेना प्रमुखांना ञास झाला आता शरद पवार तुमची बारी आली आहे असा हा व्हिडीओ चांगलाच सोशल मीडियावर धुमाकुळ घालतांना दिसत आहे