Nagar | शटडाऊनमुळे नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

नगर, (प्रतिनिधी)- शनिवारी (उद्या) महावितरण कंपनीकडून पाणी योजनेवर शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास एक दिवस उशिराने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेकडून कळवण्यात आले आहे.
या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार आहे. शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही.
त्यामुळे शनिवार बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर या भागास सकाळी 11 नंतर पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. या भागात रविवारी पाणी पुरवठा होणार आहे
रविवारी पाणी वाटप असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको,
प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायक नगर या भागात सोमवारी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
तर, सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी भागात सोमवार ऐवजी मंगळवारी पाणी सोडण्यात येणार आहे.





