पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांची चाळण ! मराठी कलाकार भडकले; सरकारला धरलं धारेवर, पाहा Video

pushkar jog | surbhi bhave : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. पालिकेची यंत्रणाही हे खड्डे बुजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, पावसामुळे खड्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फक्त पावसाळ्यातच नाही उन्हाळा आणि हिवाळ्यात देखील मुंबईतील रस्त्यांची तीच अवस्था असते. या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
दरम्यान, मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे पाहून मराठी कलाकार चांगलेच आक्रमकी झाले आहेत. ज्यामध्ये अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री सुरभी भावे यांच्या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या कलाकारांनी मुंबईच्या रस्त्यांची ही अवस्था पाहून चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता पुष्कर जोगने आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये लिहलं आहे की, “दरवर्षी तेच तेच..रस्त्यांवर खड्डे आहेत की आपण सगळे खड्ड्यात…ह्याचा ही सर्व्हे झाला पाहिजे ना? नाही नाही आपण काहीच बोलायचं नाही…आपण फक्त अवाढव्य टॅक्सेस भरत राहियचे…#जोगबोलणार माणसांचा, लहान मुलांचा आणि महिलांचा जीव महत्वाचा आहे की नाही? असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तर, दुसरीकडे अभिनेत्री सुरभी भावे हिने देखील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये अभिनेत्री म्हणते की, “नमस्कार मी अभिनेत्री सुरभी भावे. असं म्हणतात की इलेक्शन होईपर्यंत, मतं मिळेपर्यंत मतदार हा आमच्यासाठी राजा आहे. पण इलेक्शन झालं, निवडून आले की असं म्हणायचं, मतदार गेले खड्ड्यात.
View this post on Instagram
आपण सामान्य नागरिक असं मजेने म्हणतो ते कदाचित सगळ्याच राजकारण्यांनी खूपच मनावर घेतलेलं दिसतंय. असं म्हणायला हरकत नाही. मी असं का म्हणतेय हे मी तुम्हाला सांगते बघा. शूटिंगसाठी मी ठाणे ते मड असा प्रवास करत असते. मडच्या रस्त्यावर जे खड्डे बघितले. त्यामुळे या प्रवासात माझी पाठ खूप दुखतेय.
त्यामुळे जे रोज प्रवास करतात त्यांना या खड्ड्यांमधून रस्ता शोधणं किती कठीण जात असेल? माझी विनंती आहे. तुम्हाला आमचं दु: ख नक्की काय आहे हे कळणार नाही. तुम्ही स्वत: ला सामान्य जनतेचे सेवक म्हणत असाल तर सेवकासारखं तुम्ही खरं खरं वागा. असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.






