सुशांतसिंह राजपुत मृत्यू प्रकरण: मादकद्रव्याच्या प्रकरणातील फरारी आरोपीला अटक
Updated On:

मुंबई – एनसीबी म्हणजेच मादकद्रव्ये नियंत्रण पथकाच्या अधिकाऱ्यांनी मादकद्रव्ये विक्री प्रकरणातील एका फरारी आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.
त्याच्याकडून अडीच कोटी रूपयांचे मादक द्रव्य जप्त करण्यात आले असून हा आरोपी सुशांतसिंह रजपुत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत आहे असे एनसीबीने म्हटले आहे.
रेगेल महाकाल असे या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी रात्री त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ठिकाणांवर छापे घालून मलानाक्रिम नावाचे अडीच कोटी रूपयांचे मादकद्रव्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात आणखीही एकाला अटक करण्यात आली आहे.
मात्र त्याचे नाव एनसीबीने जाहीर केलेले नाही. महाकाल हा ज्या अन्य विक्रेत्यांना हे द्रव्य पुरवत होता, त्यांचीही एनसीबीने चौकशी सुरू केली आहे.





