नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत ‘घसरण’, जाणून घ्या तुमच्या शहरातील ‘लेटेस्ट दर’

gold and silver price today । देशभरात आजपासून नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. अशात आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने चांदीच्या भावात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. तर जाणून घेऊया तुमच्या शहरातील आजचा सोने चांदीचा लेटेस्ट दर…
आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६९,८५९ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७६,२१० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९२० रुपये आहे म्हणजेच चांदी ९१,९६० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे. बुधवारी चांदीचा दर ९१,४५० रुपये प्रति किलो होता तर १० ग्रॅम सोन्याचा दर ७६,३९० रुपये होता.
शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,७६८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७६११० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ९१,८६० रुपये आहे.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये इतका आहे.
नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये आहे.
gold and silver price today । सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.
gold and silver price today । हॉलमार्ककडे लक्ष द्या
सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.





