Drone Attack : खेरसोनमध्ये मिनीबसवर ड्रोन हल्ला; 2 जणांचा मृत्यू
रशियाने युक्रेनमधील खेरसोन भागातल्या मिनीबसवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात (Drone Attack) किमान 2 जण ठार झाले,, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

Drone Attack : रशियाने युक्रेनमधील खेरसोन भागातल्या मिनीबसवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात (Drone Attack) किमान 2 जण ठार झाले असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यात ७ जण जखमी देखील झाले आहेत, असे प्रादेशिक प्रमुख ओलेक्सांदर प्रोकुदिन यांनी सांगितले.
या हल्ल्यानंतर रशियाने खेरसोन भागात आणखी एका मिनीबसवर ड्रोन हल्ला (Drone Attack) केला. या हल्ल्यात मिनीबसचा चालक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.काळ्या समुद्राच्या युक्रेनच्या किनारपट्टीवर रशियाने केलेल्या हल्ल्यात ओडेसा बंदराच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.
मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रशियाने चार वर्षांपुर्वी युक्रेनवर हल्ला केला, तेंव्हापासून सातत्याने हवाई हल्ले केले जात आहेत. अमेरिकेच्या मध्यस्थीने सुरू झालेल्या शांतता चर्चेमध्ये देखील कोणतीही प्रगती झालेली नाही.
युक्रेनचा शांतता प्रस्ताव रशियाने फेटाळून लावला आहे आणि अलिकडच्या काही आठवड्यात इराण युद्धामुळे सर्व जगाचे लक्ष युक्रेन युद्धाकडून दुसरीकडे वेधले गेले आहे. दरम्यान रशियाने युक्रेनच्या इशान्येकडील सुमी प्रांतातील हद्दीतील मिरोपिलिया गावाचा ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. या दाव्यातील तथ्य पडताळून बघणे शक्य झालेले नाही. रशियाच्या या दाव्यावर युक्रेनने त्वरित प्रतिक्रिया दिलेली नाही.
शुक्रवारी युक्रेनने काळ्या समुद्राकिनाऱ्यावरील तुआप्से या रशियाच्या शहरावर केलेल्या माऱ्यामुळे (Drone Attack) तेथे माठी आग लागली होती, ही आग शनिवारी विझवण्यात आल्याचे क्रान्सोदार भागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनकडून रशियाच्या तेल प्रकल्पांवर लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा मारा केला जातो आहे.
रशियाला सैसे मिळवून देणाऱी तेल निर्यात खंडीत करण्यासाठी युक्रेनकडून हे हल्ले होत आहेत. पण इराण युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढत असल्याने युक्रेनच्या या हल्ल्यांचा आर्थिक परिणाम काय होतो आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.






