हिंजवडी आग प्रकरणातील आरोपी चालकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Hinjewadi fire incident case | हिंजवडी येथे कंपनीतील सहकाऱ्यांशी वाद विवाद तसेच कंपनीकडून मिळणारी सापत्न वागणूक यातून चालकाने मिनी बसला आग लावण्याची घटना घडली होती. यामुळे मीनी बसमधील चार जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर मिनी बसचा चालक जनार्दन निळकंठ हुंबर्डीकर (वय ५६ रा. वारजे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने हुंबर्डीकर याची न्यायालयीने कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी व्ही.पी. खंदारे यांनी हा आदेश दिला.
या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केला असून गुन्ह्याच्या अनुशंगाने तांत्रिक व इतर पुरावे गोळा करण्यात आले आहेत. असे सरकारी वकील विजयसिंह जाधव आणि तपास अधिकारी हृषिकेश घाडगे यांनी न्यायालयात सांगितले. आरोपी हुंबर्डीकर पोलिस कोठडीत असताना पोलिसांनी पाच लिटर क्षमतेचा एक कॅन आणि कापडी चिंध्या जप्त करण्यात आल्या आहेत.
हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क येथे १९ मार्च रोजी सकाळी पावनेआठ वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत बसमधील चार जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर इतर प्रवासी मृत्यूच्या दारातून परत आली. सुरुवातील या प्रकरणाकडे एक दुर्घेटना म्हणून पाहिले जात होते. पण पोलिसांनी केलेल्या तपासात सत्य काही वेगळेच समोर आले. या मिनी बसच्या चालकानेच ही आग लावण्याचे पोलीस तपासात निषन्न झाले. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती.





