दारु पिऊन गाडी चालवणे ‘तलाठ्याला’ पडले महागात
Updated On:

सातारा : दहिवडी पोलीस ठाण्याच्या आवारात दारु पिऊन वेडीवाकडी गाडी चालविल्याबद्दल तलाठी संतोष ढोले (रा. पळशी, ता. माण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबतची माहिती अशी बुधवार २९ जानेवारी रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास संतोष ढोले हे आपल्या विना नंबरप्लेटच्या चारचाकी वाहनातून पोलीस ठाणे परिसरात गाडी चालवीत होते. पोलिसांनी त्यांना थांबवले असता त्यांनी दारू पिल्याचे आढळून आले.
तसेच त्याच्याकडे कोणतेही कागदपत्रे नसल्यामुळे त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार अमोल चांगण करीत आहेत.





