“नववर्षाचं स्वागत करताना दारुऐवजी मसाला दूध प्या” – देवेंद्र फडणवीस

Updated On:

बीड – गेल्या काही वर्षांमध्ये 31 डिसेंबरला सेलिब्रेशनच्या नावाखाली खास करून तरुणपिढीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. अनेक तरुण-तरुणी 31 डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जावून व्यसनाच्या आहारी जातात.  तरुणांनी व्यसन करू नये यासाठी  शिवसंग्रामच्या वतीने   व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी त्यांनी २०१५ मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली तेव्हा दिवंगत विनायक मेटे यांच्यासह झालेल्या संवादाची आठवण करुन दिली. त्यावेळी विनायक मेटे यांनी फडणवीसांनी ३१ डिसेंबरला लोकांनी दारुऐवजी मसाला दूध प्यावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं.

यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘२०१५ साली मेटेंनी व्यसनमुक्तीची संकल्पना मांडली तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. त्यांनी मला निमंत्रित केलं होतं. व्यसनमुक्तीसाठी मोठी रॅली आणि कार्यक्रम करायचा असल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं. अलीकडे ३१ डिसेंबरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दारु आणि इतर व्यसनं यांची पार्टी केली जात असून, याचा तरुण पिढीवर विपरित परिणाम होत आहे.’

ते पुढे म्हणाले,’मला लोकांना दाखवायचं आहे की व्यसन नाही केलं तर माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणून बोलवत आहे म्हटलं होतं,’ अशी आठवण फडणवीसांनी सांगितली.

देवेंद्र फडणवीस यांचं फेसबुक लाईव्ह

आणखी संबंधित बातम्या

IAS Transfers : मोठी बातमी! महाराष्ट्रातील 25 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली; जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली

2026-04-02 23:03:22

IAS Transfers : मोठी बातमी! महाराष्ट्रातील 25 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली; जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली

Pune news : पावसाने पुणे ठप्प.! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण तरीही पोलिस वसुलीतचं रमले

2026-04-02 21:30:05

Pune news : पावसाने पुणे ठप्प.! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण तरीही पोलिस वसुलीतचं रमले

Pune Rain News : धो धो पावसाने पुणेकरांची दाणादाण.! तासाभरातच ८० ते १०० मिमी पावसाची नोंद, नागरिकांची झाली तारांबळ

2026-04-02 19:44:02

Pune Rain News : धो धो पावसाने पुणेकरांची दाणादाण.! तासाभरातच ८० ते १०० मिमी पावसाची नोंद, नागरिकांची झाली तारांबळ

Pune Rain : वादळी पावसाने पुणेकरांना झोडपलं.! शहरात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित, रस्तेही झाले जलमय

2026-04-02 19:04:35

Pune Rain : वादळी पावसाने पुणेकरांना झोडपलं.! शहरात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित, रस्तेही झाले जलमय

School Recognition : राज्यातील तब्बल 829 शाळांची मान्यता रद्द होणार? सरकारने थेट आदेश काढला..

2026-04-02 18:37:49

School Recognition : राज्यातील तब्बल 829 शाळांची मान्यता रद्द होणार? सरकारने थेट आदेश काढला..