“गरबा खेळण्यासाठी मंडपात येण्याआधी गोमूत्र प्या…”; भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा अजब सल्ला

Navratri Garba | नवरात्र उत्सवासाठी सध्या देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. गरबा खेळण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. यादरम्यान इंदोरचे भाजप जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी एक अजब सल्ला दिला आहे. गरब्यासाठी मंडपात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गोमूत्र पाजलं पाहिजे असं ते म्हणाले आहेत.
इतकेच काय तर टीळा न लावता आलेल्यांनाही गरबा मंडपात प्रवेश दिला जाऊ नये, असंही ते म्हणाले आहेत. जिल्हाध्यक्षांनी गरब्याचं आयोजन करणाऱ्या आयोजकांना दिलेल्या या सल्ल्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
चिंटू वर्मा यांनी सांगितलं की, गरबा मंडपात अनेक प्रकारचे लोक येत असतात. गर्दीमध्ये प्रत्येकाची ओळख पटवता येत नाही. यामुळे जे कोणी गरबा खेळण्यासाठी मंडपात येईल. त्याला प्रवेश देण्याआधी गोमूत्र पाजले पाहिजे. आजकाल आधार कार्डात नाव, पत्ता, धर्म यात बदल करून आधार कार्ड तयार करणे सोपे आहे. अशा स्थिती गैर हिंदू देखील हिंदू मंडपात प्रवेश करतात. अनेक परधर्मीय स्वतःची ओळख लपवून धर्म परिवर्तनासाठी गरब्याचा वापर करत असल्याचा त्यांचा दावा आहे. Navratri Garba |
गरबा पंडलामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी हे विधान केले आहे. गर्दीतून काही लोक गोंधळ घालण्याच्या उद्धेशाने सहभागी होतात. त्यामुळे आपण पूर्वकाळजी घेणं गरजेचं आहे. हिंदू व्यक्तींनी गरबा खेळायला येताना हिंदू संस्कृतीनुसार पेहराव, गंध-तिलक लावूनच प्रवेश करावा असे आवाहन त्यांनी केले. Navratri Garba |
दरम्यान, हिंदू गायीला माता मानतात, त्यामुळे गोमूत्र पिणे हिंदूसाठी अडचणीचे नाही. पण गरबा मंडपात इतर धर्माचे लोक येऊन संस्कृतीला धक्का लावत आहेत. महिलांच्या सुरक्षेला धोका पोहचवत आहे, या कारणामुळे वर्मा यांनी हा उपाय सुचवल्याचा दावा केला आहे.





