Ashok Kharat Case : राज्यात गाजत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातील आरोपी अशोक एकनाथराव खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत आज 1 एप्रिलला संपत आहे. त्यामुळे त्याला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी काल रात्री अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एसआयटीचे पथक खरातच्या घरी जाण्याअधीच खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाली. तर खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले आहे. एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी केली जात असून, त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता त्याच्या मुलाची चौकशी होणार आहे. अशोक खरात प्रकरणात अधिकाधिक माहिती गोळा करुन त्याच्या पत्नीला अटक करण्याचे एसआयटीचे लक्ष आहे. सुरुवातीला लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याचा तपास करण्यावर एसआयटीचा भर असून त्यानंतर इतर गुन्ह्याचा तपास केला जाणार आहे. अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार असून, त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्याविरोधात लैंगिक शोषण, अनेकांना आर्थिक गंडा आणि इतर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशोक खरातवर दाखल असणाऱ्या अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात याधी दोनवेळा त्याला पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा खरातची कोठडी एसआयटी कोर्टाकडे वाढवून मागणार आहेत. त्यामुळे आज अशोक खरातला कोर्टात हजर केल्यानंतर सरकारी पक्ष काय बाजू मांडतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सीएचीही चौकशी होणार एसआयटीकडून व्यापाराची फसवणूक प्रकरणी अशोक खरातची चौकशी तर, ईशान्येश्वर मंदिरात कोणते कारणामे सुरू होते. याची चौकशी आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारा सीए याची देखील एसआयटीकडून चौकशी करण्यात आली. अशोक खरातला आज कोर्टात दाखल केल्यानंतर एसआयटीकडून महत्त्वाचे पुरावे कोर्टासमोर सादर करत पुन्हा पोलीस कोठडी मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. हेही वाचा : Baramati Bypoll: बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांविरोधात कोण लढणार? अर्ज दाखल केलेले तिन्ही उमेदवार बाहेरचे