सोलापूर महामार्गावर घाण पाण्याची तळी

Updated On:
सोलापूर महामार्गावर घाण पाण्याची तळी

मांजरी – मांजरी बुद्रुक हद्दीतील राजतारा सोसायटी समोरील रस्त्यावरील ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्याचा खूपच घाणेरडा वास येतो आहे. या रस्त्यावरून चारचाकी
वाहन जाताना पाणी सगळीकडे उडते आहे. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यासाठी ते त्रासदायक ठरते आहे .
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/4182670038492766

या भागात ड्रेनेजच्या घाण पाण्याचे तळे जमा झाले आहे. त्यामुळे अपघात ही होऊ शकतो. महापालिका प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यायला हवे अशी मागणी केली जात आहे.
मांजरी बुद्रुक येथील राजतारा सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ड्रेनेजचे एक चेंबर उचंबळून आले आहे. आज मध्य रात्रीपासून हे घाण पाणी पुणे – सोलापूर महामार्गावर वाहत आहे.

पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू असल्याने साधारणपणे पाऊण ते एक किलोमीटर अंतरावरील रस्ता जलमय झाला आहे. तर सखल भागात पाणी साठून राहिले आहे. पाण्यातून घाण वास येत आहे. याशिवाय साचलेल्या पाण्यातून वाट काढताना दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहने सावकाश होत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीही होत आहे. याशिवाय वाहने जोरात गेल्यास घाण पाणी वाहनांवर उडून अपघात घडत आहेत. यातून मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन तत्काळ ड्रेनेज साफ करून पाणी बंद करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

ग्रामपचायतींने येथे १८ इंची ड्रेनेज लाईन टाकली आहे. त्यातून ग्रामपंचायत हद्दीतील या भागातील पाणी योग्य प्रकार वाहत होते, परंतु महापालिकेने ग्रामपंचायतीच्या याच छोट्या ड्रेनेज लाईनला महापालिका हद्दीतील मोठी ड्रेनेज लाईन जोडल्याने ही लाईन ओव्हर फ्लो झाली असावी, तेव्हा महापालिका ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची खात्री करून ही समस्या सोडवावी.

-शिवराज घुले,
माजी सरपंच- मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत.

आणखी संबंधित बातम्या

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

2026-10-08 22:25:36

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट