“बीफ बंदी हा राजकीय मुद्दा, करोडो हिंदू गोमांस खातात” ; पाकिस्तानामधून झाकीर नाईकचे वादग्रस्त विधान

Dr Zakir Naik on Beef । इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक सध्या पाकिस्तानात आहेत. पाकिस्तानात पोहोचल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पाकिस्तानात सध्या झाकीरने अनेक वृत्तवाहिन्यांशी संवाद साधत आहे. या मालिकांमध्ये एका वाहिनीशी बोलताना त्यानी बीफबाबत असे वक्तव्य केले होते, ज्याची सध्या भारतात जोरदार चर्चा होत आहे.
पाकिस्तानच्या एक वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत झाकीर नाईक यांना विचारले की, “भारतातील मुस्लिमांनी गोमांसावरील बंदी पाळावी का? या प्रश्नाला उत्तर देताना झाकीर नाईक म्हणाले, “एक वैयक्तिक मत आणि इस्लामिक मत आहे. इस्लामिक शरीयत म्हणते की तुम्ही ज्या देशात रहात आहात, तुम्ही त्या देशाचे कायदे पाळले पाहिजे जोपर्यंत तो देश अल्लाह आणि पैगंबराच्या नियमांच्या विरोधात जात नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या देशाने नमाजवर बंदी घातली तर तो कायदा मानला जाणार नाही कारण नमाज इस्लाममध्ये फर्द (अनिवार्य) आहे.
معروف عالم دین اور مبلغ اسلام جن کے نام سے بھارت کی کانپیں ٹانگ جاتی ہیں ان کا ایک تاریخی انٹرویو جس میں ان کے دورہ پاکستان کے حوالے سے بھی بات کی گئی ہے #DrZakirNaik #ZakirNaikInPakistan pic.twitter.com/YLXrURAtmB
— Irfan Siddiqui (@IrfanJangNews) October 1, 2024
‘गोमांस बंदी हा राजकीय मुद्दा’ Dr Zakir Naik on Beef ।
झाकीर नाईक पुढे म्हणाले, “इस्लाममध्ये गोमांस खाणे कर्तव्य नाही. जर कोणी बंधने लादली तर आपण त्याचे पालन केले पाहिजे. तुम्ही मला वैयक्तिक मत विचारल्यास, बीफ बंदी हा राजकीय मुद्दा आहे कारण करोडो हिंदू गोमांस खातात. नवीन सरकार आल्यानंतर अनेक राज्यांमध्ये गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. मुलीला त्रास दिल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि गोमांस खाल्ल्यास पाच वर्षांची शिक्षा, हा कसला तर्क?
इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षावरही मत व्यक्त Dr Zakir Naik on Beef ।
वृत्तवाहिनीशी संवाद साधताना झाकीर नाईक यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षावरही आपले मत मांडले. तो म्हणाला, “अल्लाहची योजना ही सर्वोत्तम योजना आहे, जी माणसाला नंतर कळते. उदाहरणार्थ, जर अल्लाहला पॅलेस्टाईन एका दिवसात जिंकायचे असते तर तो तो जिंकू शकला असता पण त्याने तसे केले नाही कारण अल्लाह एक उत्तम योजनाकार आहे. अल्लाहने एका दिवसात विजय मिळवला असता तर वर्षभर चाललेल्या युद्धात आज हजारो लोक पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे राहिले नसते. ७ ऑक्टोबरला घडलेल्या घटनेनंतर ९९ टक्के गैर-मुस्लिम इस्रायलच्या बाजूने होते, पण आज ९९ टक्के लोक गाझा बरोबर असल्याचे सांगत आहेत.





