पुण्यातील किडनी रॅकेटचा ससूनचा तात्कालीन अधिक्षक डॉ. तावरे सुत्रधार

पुणे – किडनी किट प्रकरणी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने तेव्हा किडनी प्रत्यारोपण प्रकरणातील ससूनच्या रिज्ञानल भरायझेशन समितीच्या सदस्यांचे जबाब नोंदवले होते. या समितीनेच किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली होती. या समितीचा डॉ. अजय तावरे हा अध्यक्ष होता. तेव्हा इतर सदस्यांनी दाता आणि रुग्णांची कागदपत्रे जुळत नसतानाही डॉ. तावरे यांनी प्रत्यारोपणाला परवानगी दिल्याचे जबाब दिले होते. यामुळे डॉ. तावरे याच्यावर
स्मष्ट ठपका देवून त्यालाही आरोपी करण्यात आले होते. मात्र, एफआयआर दाखल करताना त्यातून त्याचे नाव अचानक वगळले गेले,
रॅकेटमध्ये १५ आरोपी
किडनी रॅकेट प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांत तब्बल १५ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये रण्णा अमित अण्णासाहेब साळुंके, सुजाला अमित साळुंखे, दाता सारिका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंके, शंकर हरिभाऊ पाटील. सुनंदा हरिभाऊ पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने, रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेज चैट, रेबेका जॉन (उपसंचालक, रुबी हॉल), कायदेशीर सल्लागार मंजूषा कुलकर्णी, डॉ. अभय सद्रे, डॉ. भूपत भाटी, डॉ. हिमेश गांधी, समन्वयक सुरेखा जोशी यांचा समावेश होता. याप्रकरणी आरोग्यसेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग सीताराम कदम यांनी तक्रार दिली होती.
किडनी स्ॉपिंग*
किडनी दाता सारिका गंगाधर सुतार ही कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे राहते. तेथे ती हॉटेलमध्ये चपात्या लाटून आपल्या दिव्यांग मुलासह दोन मुलांना सांभाळते. पतीने काही वर्षांपूर्वीच तिची साथ सोडली होती. तिच्या डोक्यावर कर्ज असल्याने व मुलांच्या भविष्याच्या चिंतेने ती सतत तणावात असायची. दरम्यान वर्षभरापूर्वी तिला एक महिला भेटली. तिने
तिची पैशांची गरज ओळखून रविमाऊ नावाच्या एजंटाची ओळख करून दिली, या एजंटने तिच्यासमोर पैशांच्या बदल्यात तिची किडनी पुण्यातील अमित साळुंके नावाच्या व्यक्तीला विकल्यास १५ लाख रुपये मिळतील, असे आश्वासन दिले, तसेच एका किडनीचरडी तू जिवंत राहू शकते, असे सांगितले.
दरम्यान, १५ लाख रुपये मिळणार म्हणून सारिका सुतार हिने किडनी देण्यास होकार दर्शविला, मात्र, कायद्याने किडनी ही जवळच्या नातेवाईकांना देण्यात येते. या प्रत्यारोपणासाठी ऑगस्ट २०२१ ते २९ मार्च २०२२ दरम्यान साळुंखे दाम्पत्याने दलाल रखी गायकवाड आणि अभिजीत मदने यांच्या मदतीने कट रचला. यासाठी सारिका हिला साळुंकेची पत्नी दर्शविण्यासाठी आवश्यक असलेली बनावट कागदपत्रे बनविण्यात आली. त्यामध्ये सारिका यांचे नाव शोभा साळुंके असे करण्यात आले. त्यांनी तिने तसे लेखी संबंधित किडनी प्रत्यारोपण समितीकडेही कबूल केले.
याच कागदपत्राच्या आधारे सारिका हिची किड़नी काढून एका किड़नी आवश्यक असलेल्या १९ वर्षीय तरुणीला देण्यात आली. त्या तरुणीच्या आईची किड़नी साठळक यांना बसविण्यात आली. ही प्रत्यारोपण शसक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
असा झाला पर्दाफाश
यादरम्यान संबंधित रुग्ण साळुंके याची खरी पत्नीही हॉस्पिटलमध्ये तिची विचारपूस करण्यासाठी येत जात होती. किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर सारिकाने तिच्या बहिणीला एजंट रवीभाऊने पैसे दिले का, अशी विचारणा केली. त्यावर रवीने केवळ ४ लाख रुपये देण्याचे मान्य केल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे १५ लाख रुपये न मिळाल्याने त्यांच्यातील झालेला तोडी व्यवहार फिस्कटला, व्यानंतर सारिका व नातेवाईकांनी कोरेगाव पार्क पोलिसांत तक्रार अर्ज दिल्यावर पर्दाफाश झाला.
असा सापडला डॉ.तावरे जाळ्यात
किडनी रॅकेट प्रकरणात डॉ.तावरे हा एफआयआर मधून स्वत:चे नाव वगळण्यात यशस्वी झाला होता. मात्र पोर्शे कार प्रकरणात तो चांगलाच अडकला. दरम्यान जुन्या गुन्हयांचे निर्गतीकरण करताना पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस किडनी रॅकेट गुन्हयातील समितीचा अहवाल वाचणात आला. त्यात डॉ. तावरेचे नाव असतानाही गुन्हा दाखल नसल्याचे दिसले. यामुळे पोलिसांनी प्रकरणाच्या पुन्हा मुळाशी जाऊन तपास केला. तेव्हा डॉ. तावरे याचीच प्रत्यारोपनात मुख्य भुमिका असल्याचे उघड झाले. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने डॉ. तावरेला सह आरोपी करण्याच्या दुष्टीने पावले उचलली. त्याच्यावर एक दोन दिवसांत गुन्हा दाखल होऊ शकतो.





