Pune News : डॉ. रमा गायकवाड यांना महाराष्ट्र भूषण सन्मान प्रदान
Pune News : पर्वती येथील अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या विभागप्रमुख डॉ. रमा गायकवाड यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने 'महाराष्ट्र भूषण सन्मान २०२६' प्रदान करून गौरविण्यात आले.

Pune News : संगणक अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधन, आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थी विकासातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पर्वती) येथील विभाग प्रमुख डॉ. रमा गायकवाड यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र भूषण सन्मान २०२६ प्रदान करण्यात आला. (Pune News)
आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रांत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव केला जातो. डॉ. गायकवाड यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोधनिबंध, पेटंट्स आणि शैक्षणिक प्रगतीतील मौलिक योगदान विचारात घेऊन त्यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पदक देऊन गौरविण्यात आले. (Pune News)
या यशाबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड आणि प्राचार्य डॉ. सुनील ठाकरे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. (Pune News)
Pune News : अंजू शेंडे पुण्याच्या नवीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश





