उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पांचे दर्शन; राज्यातील अरिष्ट टाळण्यासाठी गणरायाकडे प्रार्थना

पुणे – राज्यातील दृष्काळाची छाया नष्ट होऊन सुखसमृद्धी लाभावी, बळीराजा संतुष्ट होऊन राज्यातील सर्व प्रकारचे अरिष्ट टळावे. महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी लोकाभिमुख व जनसामान्यांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे, अशी प्रार्थना उपसभापती, शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी गणरायाकडे केली.
पुणे शहरातील मानाच्या गणपती बाप्पाचे दर्शन आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी घेतले. यावेळी कसबा गणपती, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, मंडई गणपती, केसरी वाडा येथील गणरायाचे दर्शन घेऊन मनोभावे पुजा केली.
यावेळी सहसंपर्क प्रमुख दर्शना त्रिगुणाईत, सारिका पवार , मनिषा पारंडे जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख संजिवनी विजापूरकर विभाग प्रमुख, श्रृती राजरकर, जयश्री मोरे उपशहर प्रमुख तसेच शिवसेना भवन कार्यालय प्रमुख सुधीर जोशी उपस्थीत होते.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पांचे दर्शन; राज्यातील अरिष्ट टाळण्यासाठी गणरायाकडे प्रार्थना pic.twitter.com/LpQZYAq2jS
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) September 9, 2024





