“देशाने एक महान अर्थतज्ञ, दूरदर्शी सुधारक अन् जागतिक राजकारणी गमावला” ; शरद पवारांकडून शोक व्यक्त

Dr.Manmohan Singh passes Away । माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं काल रात्री निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशभरात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे. तसेच राजकीय वर्तुळातूनही त्यांच्या निधनविषयी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मनमोहन सिंग हे दूरदर्शी सुधारक अन् जागतिक राजकारणी Dr.Manmohan Singh passes Away ।
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी शोक व्यक्त करताना म्हटले की, देशाने एक महान अर्थतज्ञ, दूरदर्शी सुधारक आणि जागतिक राजकारणी गमावला आहे. ” असे त्यांनी म्हटले.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे.
त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॅा. मनमोहन… pic.twitter.com/QsvqAEwSwA
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 26, 2024
भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार Dr.Manmohan Singh passes Away ।
शरद पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या पोस्टमध्ये शरद पवार यांनी, “भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल कळाले ते ऐकून खूप दुःख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थशास्त्रज्ञ, एक दूरदर्शी सुधारक आणि जागतिक राजकारणी गमावला आहे.” सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्हणून शरद पवार यांनी काम केले. पुढे बोलताना शरद पवार यांनी, “त्यांच्या जाण्याने असह्य नुकसान झाले आहे. ते नम्रता, संयम, सहिष्णुता आणि करुणा यांना मूर्त रूप देणारे ईश्वरनिष्ठ आत्मा होते. भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार या नात्याने त्यांचा वारसा येणाऱ्या पिढ्यांना नेहमी प्रेरणा देत राहतील त्यांच्या आत्म्याला सदैव लाभो..” असे त्यांनी म्हटले आहे.





