डॉ. आंबेडकरांनाही ३७० कलम मान्य नव्हते- मायावती

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच देशाची एकता, सामंत आणि अल्हान्दतेच्या बाजूने होते. त्यांना जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलाम ३७० कधीच मान्य नव्हते असे मत बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी ट्विटरद्वारे व्यक्त करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

डॉ.आंबेडकर हे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जाच्या देणाऱ्या कलम 370च्या बाजूनं कधीच नव्हते. त्यामुळेच बहुजन समाज पक्षाच्या खासदारांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याला समर्थन दिलं आहे. देशाचं संविधान लागू होऊन जवळपास 69 वर्षांनंतर 370 कलम हटवण्यात आलं आहे. आता तिकडची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ अवश्य लागणार आहे. यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे. ज्याचं न्यायालयानंही समर्थन केलं आहे.

सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस आणि इतर पक्षाच्या नेत्यांकडून काश्मीरमध्ये जाणे म्हणजे केंद्र आणि जम्मू काश्मीरमधील राज्यपाल सत्यपाल मलिक यांना राजकारण करण्यासाठी संधी देणे असा निर्णय नाही का? त्याठिकाणी जाण्यापूर्वी थोडा विचार केला असता तर योग्य राहिलं असतं अस ट्विट करत मायावतींनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना टोला लगावला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.