Dr Bipin Sule : डॉ. बिपीन सुळे यांना ‘जेम्स ऑफ महाराष्ट्र-2026’ पुरस्कार
Dr Bipin Sule : विश्वकर्मा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अँड युनिव्हर्सिटी, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. बिपीन सुळे यांना व्यावसायिक व व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा 'जेम्स ऑफ महाराष्ट्र-2026' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Dr Bipin Sule : विश्वकर्मा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अँड युनिव्हर्सिटी, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. बिपीन सुळे यांना व्यावसायिक व व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘जेम्स ऑफ महाराष्ट्र-2026’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबईतील प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते डॉ. सुळे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
व्यावसायिक शिक्षण, व्यवस्थापन शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, कौशल्याधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. बिपीन सुळे यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
या सन्मानाबद्दल शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. सुळे यांचे अभिनंदन केले असून, विश्वकर्मा ग्रुपच्या शैक्षणिक कार्याला या पुरस्कारामुळे आणखी बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.





