डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक ; अमित शहा यांच्याविरोधात आज देशभरात निदर्शने

Dr.Bhimrao Ambedkar Row । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून देशभरात चांगलेच वातावरण तापले आहे. बुधवारी झालेल्या आंदोलनानंतर काँग्रेसने आता या प्रकरणीआक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार गुरुवारी देशभरात निदर्शने करण्याचे नियोजन केले आहे. या निदर्शनादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, “काँग्रेसने देशभरात निदर्शने करण्याची योजना तयार केली आहे. या अंतर्गत सर्व प्रदेश काँग्रेस कमिटी (पीसीसी), राज्य आणि जिल्हा युनिट्सनी जिल्हा कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अमित शाह यांनी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. ज्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारला कोंडीत पकडले आहे.
संसदेचे कामकाजही तहकूब Dr.Bhimrao Ambedkar Row ।
या प्रकरणी काँग्रेस, टीएमसी, द्रमुक, आरजेडी, डावे पक्ष आणि शिवसेना-यूबीटीसह जवळपास सर्वच विरोधी पक्षांच्या हल्ल्यामुळे बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले. नरेंद्र मोदींना अमित शहांच्या बचावासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट करत काँग्रेसवर पलटवार केला होता. त्यात त्यांनी काँग्रेसवर आंबेडकरांचा वारसा नष्ट करण्याचा आरोप केला आहे. त्यानंतर महित शाह यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत काँग्रेसने आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे म्हटले.
काय म्हणाले अमित शहा? Dr.Bhimrao Ambedkar Row ।
दरम्यान, मंगळवारी राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान अमित शहा यांनी आंबेडकरांबद्दल भाष्य केले होते. त्यांनी “आजकाल ही एक फॅशन झाली आहे – आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर जर तुम्ही देवाची इतकी नावे घेतली असती तर तुम्ही सात जन्म स्वर्गात गेला असता.” असे म्हटले होते. अमित शाह यांनी आपल्या भाषणात अनेकवेळा काँग्रेसवर हल्लाबोल केला होता, पण बाबासाहेब आंबेडकरांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याने विरोधकांना एक संधी मिळाली आहे, त्याशिवाय आता ते अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.





