Pune News : अन्नदानाच्या उपक्रमाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी
Updated On:

पुणे : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी डिजे वाजविण्यावर होणार खर्च टाळून अन्नदानाचा उपक्रम राबवित विधायक पध्दतीने साजरी करण्यात आली आहे. सिंहगड रोड, सर्व्हे, नंबर 133 मध्ये नवरत्न तरुण मंडळ व रमाई प्रतिष्ठान च्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
त्यात डिजे तसेच डॉल्बीचा अनावश्यक खर्च टाळून अन्नदान हेच सर्वश्रेष्ट दान समजून परिसरातील नागरिकांसाठी महाभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतूक करण्यात आले.





