Satara | डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीवर नियुक्तीबद्दल अमित कुलकर्णी यांचा सत्कार

सातारा, (प्रतिनिधी) – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातर्गत शासनाने गठीत केलेल्या मुंबईच्या डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती झाल्याबद्दल सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, माऊली ब्लड बँकेचे मार्गदर्शक व ज्येष्ठ रक्तदाते अजित कुबेर, डॉ. गिरीश पेंढारकर, शालेय समितीचे सदस्य सारंग कोल्हापुरे,
शालाप्रमुख सौ. सुजाता पाटील, माऊली ब्लड बँकेचे माधव प्रभुणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगीराज वारले, पालक संघाच्या अध्यक्ष सौ. ठोंबरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
सौ .सुजाता पाटील म्हणाल्या, अमित कुलकर्णी यांची निवड ही गौरवास्पद आहे. डॉ. युवराज करपे म्हणाले, न्यू इंग्लिश स्कूलचे नाव सर्व जगात पोहोचलेले आहे.
आज देश विदेशात शाळेचे माजी विद्यार्थी आपल्या विजयी पताका फडकवत आहेत. अमित कुलकर्णी यांची राज्य पातळीवरील परिषदेवर झालेली निवड अभिनंदनीय आहे.
अमित कुलकर्णी म्हणाले, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा 14 वर्षांचा अनुभव, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेचा दहा वर्षांहून अधिकचा अनुभव यासह आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने ही जबाबदारी देखील यशस्वीरित्या पार पाडीन.
श्रीमती महाडिक यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी उपशालाप्रमुख श्रीमती विनया कुलकर्णी, पर्यवेक्षक राजेश सातपुते, जनार्दन नाईक, अनिता कदम, ज्येष्ठ उद्योजक धनंजय थोरात, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व पालक संघाचे प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते.





