Satara: राष्ट्र उभारणीत डॉ. आंबेडकरांचे अनन्यसाधारण योगदान; डॉ. प्रा. अरुण गाडे
Satara डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती च्या वतीने महात्मा फुले द्विशताब्दी व महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षा निमित्त सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभा मंडपात आयोजित व्याख्यान मालेतील डॉ. गाडे यांनी सहावे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी प्रा.चंद्रकांत मस्के होते. समितीचे अध्यक्ष गणेश कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Satara: भारत देशाच्या एकूणच राष्ट्र उभारणीत अनेक दिग्गज नेत्यांचे मोठे योगदान आहे. त्यामध्ये या देशाला समता, न्याय, बंधूत्व मुलक संविधान निर्मिती करून या देशातील शेवटचा माणूस केंद्र बिंदू मानून देशात लोकशाही प्रस्थापित करून एकसंध संविधानीक राष्ट्र उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनन्यसाधारण योगदान आहे, असे मत प्रा. डाॅ. अरुण गाडे यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती च्या वतीने महात्मा फुले द्विशताब्दी व महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षा निमित्त सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभा मंडपात आयोजित व्याख्यान मालेतील डॉ. गाडे यांनी सहावे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी प्रा.चंद्रकांत मस्के होते. समितीचे अध्यक्ष गणेश कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डाॅ आंबेडकर यांनी रिझर्व बँकेची स्थापना करून या देशाचे अर्थकारण मजबूत करण्याचे धोरण ठरवून राष्ट्र मजबुतीचे काम केले. या देशातील सर्वात मोठी धरणे दामोदर व्हॅली, हिराकुंड व्हॅली, सोन नदी या ठिकाणी उभारण्याचा मानस व्यक्त करून या प्रकल्पाच्या माध्यमातून जल विद्युत आणी श्रम या बाबतचे स्पष्ट धोरण आखले. देशातील सर्व नद्या एकमेकांस जोडून पाण्याचा प्रश्न नद्या जोड प्रकल्पाच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिल्याचे प्रा. गाडे यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत मस्के म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्व प्रवर्गाच्या विकासात्मक तसेच स्त्रीयांच्या सन्मान जनक उभारणीमध्ये मोठे योगदान दिले. प्रारंभी शाहीर श्रीरंग रणदिवे व समारोपा वेळी शाहीर किरण जगताप यांनी शाहीरी गीते सादर करुन उपस्थितांमध्ये जोश निर्माण केला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, सम्यक जेष्ठ नागरीक संघाचे संघटक बी. एल. माने, बाळासाहेब सावंत, दादासाहेब केंगार, नारायण जावलीकर,शहाजी वाघमारे,माणिक आढाव,विश्वास सावंत,मारूती भोसले,पी. टी. कांबळे,नंदकुमार काळे,विजयानंद कांबळे,महादेव मोरे,दिलीप भोसले,अदिनाथ बिराजे,विकास तोडकर,एस. पी. गायकवाड,अरविंद गाडे आदी होते. प्रा.रामचंद्र गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.अजित कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. रमेश जाधव यांनी आभार मानले.





