Paris Olympics 2024 : ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरचे दिल्लीत जंगी स्वागत, पहा व्हिडीओ…

नवी दिल्ली – पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर बुधवारी मायदेशी परतली. दिल्ली विमानतळावर पोहोचताच तिची वाट पाहत असलेल्या चाहत्यांनी तिचे भव्य स्वागत केले. यावेळी मनूचे आई-वडीलही उपस्थित होते.
#WATCH | On receiving a grand welcome in Delhi after returning from the historic #ParisOlympics2024 for her, double medal winner Manu Bhaker says, “I am so happy to get so much love here…” pic.twitter.com/H4tcoKZwF1
— ANI (@ANI) August 7, 2024
मनूसोबत त्याचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचेही जोरदार स्वागत झाले. यावेळी बोलताना मनू म्हणाली, ‘इतकं प्रेम मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे.’
The Queen Manu returns! 🫅🏼
On her arrival at Delhi’s Indira Gandhi Airport 🛩️, Manu was surrounded by dozens of thrilled supporters who couldn’t wait to take selfies with our double medallist at the #Paris2024Olympics.
Cheer for Manu and the rest of the contingent and continue… pic.twitter.com/yMICwtp3iK
— SAI Media (@Media_SAI) August 7, 2024
याप्रंगी, ढोल-ताशांच्या गजरात चाहत्यांनी दोघांचेही उत्साहात स्वागत केले. त्याचवेळी काही चाहत्यांना मनूसोबत सेल्फी घेण्याची संधीही मिळाली. यावेळी मनूचे, पालक तिला घेण्यासाठी विमानतळावर पोहोचले. त्यांच्या चेहऱ्यावर मुलीच्या कामगिरीचा आनंद स्पष्ट दिसत होता.
#WATCH | Delhi: Double Olympic medalist Manu Bhaker says “It feels great the way I was welcomed at the airport and the hotel. I am very happy that the people of the country are supporting me like this. I have brought home 2 medals and a lot of inspiration and motivation to work… pic.twitter.com/ocdpFqKLaJ
— ANI (@ANI) August 7, 2024
प्रसारमाध्यमांशी बोलताना तिच्या पालकांनी सांगितले की, मनूने मिळवलेले यश कोणत्याही पालकांसाठी अभिमानास्पद आहे. मनूची आई सुमेधा म्हणाल्या की, मनूवर लोकांचे अपार प्रेम पाहून मला खूप आनंद झाला.





