T20 World Cup 2024 : केन विल्यमसनच्या ‘त्या’ दोन निर्णयामुळे न्यूझीलंडला दुहेरी धक्का…

T20 World Cup 2024, Kane Williamson :- टी-20 विश्वकरंडक 2024 मध्ये सुपर-8 मध्ये स्थान न मिळवू शकलेला न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनने टी-20 आणि वनडे च्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्याने बोर्डाचा केंद्रीय करारही नाकारला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, आणखी एक क्रिकेटर लॉकी फर्ग्युसननेही राष्ट्रीय करार घेण्यास नकार दिला आहे.
मात्र, तो तिन्ही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडकडून खेळत राहणार आहे. विल्यमसनने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, तो उन्हाळी हंगामात परदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी शोधत आहे, त्यामुळे न्यूझीलंडचा केंद्रीय करार स्वीकारू शकत नाही. त्याला आपल्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे.
विल्यमसन पुढे म्हणाला की, न्यूझीलंडसाठी खेळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि संघासाठी काहीतरी करण्याची इच्छाही कमी नाही. मी संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत राहीन.
विल्यमसनने 40 कसोटी सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये संघाने 22 सामने जिंकले असून 10 सामने गमावले आहेत. तर 8 सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याने 75 टी-20 मध्ये संघाचे नेतृत्व केले आहे, 39 जिंकले आणि 34 हरले. 1 सामना अनिर्णित राहिला आहे. विल्यमसनने 91 एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले असून संघाने 46 सामने जिंकले आहेत आणि 40 सामने गमावले आहेत.





