Mohan Yadav : भोपाळमधील प्रमुख रस्त्यांवर महापुरूषांच्या नावाने द्वार उभारणार; मुख्यमंत्री मोहन यादव यांची घोषणा

भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर महापुरुषांच्या नावाने द्वार उभारले जाणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, भोपाळसह मध्य प्रदेश आपल्या शूर राज्यकर्त्यांच्या नावाने ओळखला जातो. म्हणूनच, आमच्या सरकारने असा निर्णय घेतला आहे की, लोकांपर्यंत गौरवशाली भूतकाळ पोहोचवण्यासाठी, राजधानीतील सर्व प्रमुख रस्त्यांवर महापुरुषांच्या नावाने दरवाजे बांधले जातील.
यापूर्वी, मुख्यमंत्री यादव यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केल्यामुळे तीही चर्चेचा विषय ठरली आहे. या महिन्यात राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना धान खरेदीवर प्रति हेक्टर ४००० रुपये प्रोत्साहन रक्कम दिली जाण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना आधीच अनेक भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशात गहू खरेदीसाठी प्रति क्विंटल २६०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकार जाहीरनाम्यानुसार सार्वजनिक कल्याणासाठी सातत्याने महत्त्वाचे निर्णय घेत आहे. याआधीही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केन बेतवा नदी जोडणी प्रकल्पावर काम सुरू आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढवण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल. राज्याच्या समृद्धीसाठी असे प्रकल्प महत्त्वाचे ठरतीलअसे नमूद करत धान खरेदीसाठी प्रोत्साहन रकमेबद्दल त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच गहू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १७५ रुपये अतिरिक्त बोनस रक्कम देखील दिली जाईल असे त्यांनी जाहीर केले.





