Dia Mirza: “काळजी करू नकोस, एक दिवस तू माझ्या आईची भूमिका करशील…”; १९ वर्षांच्या दिया मिर्झाला सलमान खानने केलेलं विधान पुन्हा चर्चेत
Dia Mirza फराह खानने गप्पांच्या दरम्यान सुचवलं की, दिया मिर्झाने पुन्हा एकदा सलमान खानसोबत काम करायला हवं. त्यावर दिया हसत म्हणाली की, आता सलमान तरुण अभिनेत्रींसोबत काम करत असतील. याचवेळी तिने एक जुनी आठवण सांगितली.

Dia Mirza: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) सध्या तिच्या एका जुन्या आठवणीमुळे चर्चेत आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानसोबतच्या गप्पांमध्ये तिने अभिनेता सलमान खानबद्दलचा एक मजेशीर किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
फराह खानच्या यूट्यूब चॅनेलसाठी दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिया मिर्झाने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी दोघींनी एकत्र हेल्दी बनाना ब्रेड तयार करत गप्पा मारल्या. याच दरम्यान ‘तुमको ना भूल पाएंगे’ या चित्रपटाच्या शूटिंगमधील एक मजेदार प्रसंग तिने सांगितला. (Dia Mirza)
२००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘तुमको ना भूल पाएंगे’ या चित्रपटात सलमान खान, दिया मिर्झा आणि सुष्मिता सेन प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटादरम्यान दिया मिर्झा केवळ १९ वर्षांची होती आणि तिची कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती. (Dia Mirza)
फराह खानने गप्पांच्या दरम्यान सुचवलं की, दिया मिर्झाने पुन्हा एकदा सलमान खानसोबत काम करायला हवं. त्यावर दिया हसत म्हणाली की, आता सलमान तरुण अभिनेत्रींसोबत काम करत असतील. याचवेळी तिने एक जुनी आठवण सांगितली.
Farah Khan : Do you work with Salman or not?
Dia Mirza : After TNBP, no
Farah Khan : You should do it now
Dia Mirza : #SalmanKhan told me on my first film, one day you will play the role of my mother
Farah : Now in Maatrubhumi, if there’s a mother’s role, then Dia is ready pic.twitter.com/XlhJFwWR0U
— Devil V!SHAL (@VishalRC007) June 22, 2026
दिया म्हणाली, “माझ्या पहिल्याच चित्रपटात सलमान खान मला म्हणाले होते, ‘बघ, एक दिवस तू माझ्या आईची भूमिका करशील.’” हे ऐकून त्या वेळी ती खूपच घाबरली होती. कारण त्या वेळी ती फक्त १९ वर्षांची होती. तिने सांगितलं की, ती, सलमान खान आणि अभिनेता राजपाल यादव एका दृश्याच्या शूटिंगची वाट पाहत बसले होते. (Dia Mirza)
चित्रपटात सलमान खानच्या आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने नुकतंच बाळाला जन्म दिला होता. हे पाहून दिया आश्चर्यचकित झाली आणि तिने सलमानला विचारलं, “या तुमच्या आईची भूमिका करत आहेत आणि त्यांनी नुकतंच बाळाला जन्म दिला आहे. म्हणजे त्या खूप तरुण असतील.” (Dia Mirza)
यावर सलमान खानने मिश्कील अंदाजात उत्तर दिलं, “काळजी करू नकोस, तुझ्यासोबतही असंच होणार आहे.” सलमानच्या या उत्तराने त्या वेळी दिया खूपच चकित झाली होती. मात्र आज अनेक वर्षांनंतर तिने हा किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
Dia Mirza recently recalled that during the shooting of a song from Tumko Na Bhool Paayenge nearly 200000 people gathered making it extremely difficult to get out of the crowd
Man, that’s insane. Just think about the level of stardom Megastar Salman Khan had and still. From his… pic.twitter.com/XQuOfkl31i
— BeingXSohail (@BeingSohail__) June 22, 2026
याच मुलाखतीत दिया मिर्झाने ‘तुमको ना भूल पाएंगे’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला आणखी एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली की, एका गाण्याच्या शूटिंगसाठी प्रचंड गर्दी जमली होती. जवळपास दोन लाख लोक शूटिंग पाहण्यासाठी आले होते. त्या गर्दीतून बाहेर पडून हॉटेलपर्यंत पोहोचणं हे मोठं आव्हान होतं. (Dia Mirza)
‘तुमको ना भूल पाएंगे’ हा चित्रपट २२ फेब्रुवारी २००२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन पंकज पराशर यांनी केलं होतं. चित्रपटात सलमान खान, दिया मिर्झा आणि सुष्मिता सेन यांच्यासोबत इंदर कुमार, राजपाल यादव, मुकेश ऋषी, जॉनी लीव्हर, आलोक नाथ, अरबाज खान आणि इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते. (Dia Mirza)
दरम्यान, सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटाचं आधीचं नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ असं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन अपूर्वा लाखिया करत असून अभिनेत्री चित्रांगदा सिंग मुख्य भूमिकेत झळकणार आहे. (Dia Mirza)
दिया मिर्झाने सांगितलेला हा हलकाफुलका किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.





