KBCच्या 10 वर्षीय स्पर्धक इशित भट्टला ट्रोल करू नका: ‘सिक्स पॉकेट सिंड्रोम’मुळे त्याने तसं केलं?

KBC kid Ishit Bhatt: ‘कौन बनेगा करोडपती १७’ या लोकप्रिय कार्यक्रमातील १० वर्षीय स्पर्धक इशित भट्ट याच्या आत्मविश्वासपूर्ण वागण्यामुळे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, त्याच्या या वागण्यावरून त्याला ट्रोल करण्याऐवजी सहानुभूती दाखवावी, असा सल्ला चंदीगड येथील एका उद्योजकाने दिला आहे. इशितच्या वागण्यामागे ‘सिक्स पॉकेट सिंड्रोम’ नावाचा सामाजिक मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा मुद्दा मूळचा चीनमधील असून आता भारतातही दिसत आहे, असे त्यांचे मत आहे.
‘सिक्स पॉकेट सिंड्रोम’ म्हणजे काय?
चंदीगडचे उद्योजक शेखर दत्त यांनी एक्सवर याबाबत लिहिले आहे. ते म्हणाले, “जेव्हा एका मुलाला आई-वडील आणि आजी-आजोबा अशा सहा जणांकडून अतिलाड आणि प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाते, तेव्हा त्याला ‘सिक्स पॉकेट सिंड्रोम’ होतो. यामुळे मुलांमध्ये हटवादीपणा आणि हक्काचा भाव निर्माण होतो.” इशितच्या वागण्यामागेही अशीच पार्श्वभूमी असू शकते, असे त्यांनी नमूद केले. भारतीय मुलांमध्ये आता हा सिंड्रोम दिसत असून, यामागे पालकांचा अतिलाड आणि शिस्तीचा अभाव कारणीभूत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया –
शेखर यांच्या या पोस्टला २.३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आणि आधुनिक पालकत्वामुळे मुलांमध्ये अतिआत्मविश्वास येतो, असे म्हटले. तर काहींनी इशितच्या वागण्याला उत्साह आणि घाबरटपणाचे कारण मानले. “एका १० वर्षीय मुलाला असे ट्रोल करणे चुकीचे आहे,” असेही काहींनी म्हटले.
why we should stop trolling that KBC kid 🙏
— Shekhar Dutt (@DuttShekhar) October 13, 2025
इशितच्या वागण्यावरून वाद –
गुजरातमधील पाचवीच्या वर्गात शिकणारा इशित भट्ट याने ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना नियम पुन्हा सांगण्याऐवजी प्रश्न विचारण्याची घाई केली. त्याच्या या वागण्याला काहींनी उद्दामपणा ठरवलं, तर काहींना तो अनुभवाच्या अभावामुळे झालेला उत्साह वाटला. मात्र, २५,००० रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर चुकल्याने इशितला रिकाम्या हाताने परतावे लागले. यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर टीका आणि मीम्सचा पाऊस पडला.
सहानुभूतीचा सूर –
इशितला ट्रोल करण्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “एका लहान मुलाला अशा प्रकारे लक्ष्य करणे योग्य नाही. त्याच्या पालकांनी त्याला शिस्त आणि नम्रता शिकवली पाहिजे होती, पण त्याला ट्रोल करणे चुकीचे आहे,” असे @theskindoctor13
यांनी लिहिले. तर “इशितला या अनुभवातून बरेच काही शिकायला मिळाले. आता त्याला ट्रोल करणे थांबवावे,” असे @niks_1985
यांनी म्हटले.
पालकत्वावर चर्चा –
‘सिक्स पॉकेट सिंड्रोम’ आणि आधुनिक पालकत्व यावरून सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. लहान मुलांना समजून घेऊन त्यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे, असा सूर अनेकांच्या प्रतिक्रियांमधून दिसतो. इशितच्या या प्रकरणाने भारतीय कुटुंबांमधील बदलत्या पालकत्व शैलीवर प्रकाश टाकला आहे.
The boy Ishit Bhatt Interrupts Amitabh Bachchan on KBC, Exits with Zero.
While everyone is furiously reacting over this child’s behaviour blaming his parents, let me tell you that generation by generation from bad to worse are being born! Analyse yourself with your parents!!! pic.twitter.com/xztIzF5Q1t— Mr.X (@X_fromIndia) October 12, 2025





