Raj Thackeray : “उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील उद्योगपती मुंबईत आले, तर…”; केंद्रीय मंत्र्याचा राज ठाकरेंना सल्ला
Raj Thackeray : 'राज ठाकरे कितीही आक्रमक झाले तरी, त्यांचे लोक निवडून येत नाहीत'

Raj Thackeray : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मराठीच्या मुद्यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरेंना एक सल्ला दिला. हिंदीमध्ये बोलूच नका, असे सांगणे योग्य नाही, असे आठवले यांनी सांगितले आहे. तसेच एका कार्यक्रमादरम्यान, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हिंदी बोलण्यावरून टीका केली होती. त्यावर देखील रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात आधी मराठीत नंतर हिंदीत एक विधान सांगितलं होतं. याबाबत राज ठाकरे म्हणाले होते की, “मिसिंग लिंकबाबत कोणी राजकारण करेल तर…” वाक्य संपता संपतचा त्यांनी हिंदींत “मिसिंग लिंक के बारे मे कोई राजनीती करेगा तो…” असं म्हणाले, का कोणासाठी हिंदी?” अशी टीका केली होती.
यावर आता रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री हिंदीमध्ये बोलल्याने एवढा राग येण्याची राज ठाकरे यांना गरज नाही. उद्धव ठाकरेही हिंदीत बोलतात, याची आठवण रामदास आठवले यांनी करून दिली.
पुढे पत्रकारांसोबत संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले की, “राज ठाकरे हे महाराष्ट्राचे सक्रीय नेते आहेत. मराठीचा त्यांना अभिमान आहे आम्हाला पण मराठीचा अभिमान आहे. हिंदीमध्ये बोलूच नका, असे सांगणे योग्य नाही. उत्तर प्रदेश किंवा बिहार येथील उद्योगपती इथे आले, तर त्यांच्याशी मराठीत बोलणार का? परदेशातील एखादे शिष्टमंडळ मुंबईत आले, तर त्यांच्याशी मराठीत बोलणार का?” असा सवालही त्यांनी केला.
‘राज ठाकरे कितीही आक्रमक झाले तरी, त्यांचे लोक निवडून येत नाहीत’
“हिंदीमध्ये बोलू नका, हा राष्ट्रभाषेचा अपमान आहे. मराठीचा अभिमान असायला काही हरकत नाही. राज ठाकरे यांची मुले इंग्रजी माध्यमातून शिकली. राज ठाकरे जेवढे आक्रमक होतील, तेवढा आमचा फायदा आहे, राज ठाकरे कितीही आक्रमक झाले तरी, त्यांचे लोक निवडून येत नाहीत, आमचे लोक निवडून येत नाहीत, त्यांनी एवढ आक्रमक होऊ नये,” असा टोलाही आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला. Raj Thackeray
‘मराठीचा विषय आणून मुंबईची प्रतिमा खराब करू नका’
दुसरीकडे, मुंबईत ऑटो-रिक्षा चालकांना मराठी येणे आवश्यक असल्याबाबत सरकारने निर्णय घेतलेला आहे. याबाबत देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मराठी आले पाहिजे, ही बाब खरी आहे. परंतु, प्रवासी हिंदी भाषिक असेल, तर त्यांनी मराठीत बोलायचे का, मुंबईमध्ये अनेक लोक येत असतात, देशभरात मराठी लोक आहेत. मुंबई आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे ६० टक्के लोक अमराठी आहेत आणि ४० टक्के लोक मराठी आहेत. सगळ्यांना या ठिकाणी येण्याचा अधिकार आहे. Raj Thackeray
आम्हालाही मराठी भाषेबाबत आदर आहे. दिल्लीत ४ ते ५ लाख लोक मराठी आहेत. संपूर्ण देशात मराठी माणसे पाहायला मिळतात. राज ठाकरे हे घटनेचा अपमान करत आहेत. त्यांना मराठीबाबत अभिमान आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, प्रत्येक वेळेला मराठीचा विषय आणून मुंबईची प्रतिमा खराब करू नका,” असेही आठवले म्हणाले.
हेही वाचा:






