“जुन्या प्रेमाला विसरायचं नसतं”; नितेश राणेंनी दिल्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या मुख्यमंत्र्यांना ‘खोचक शुभेच्छा’

Updated On:
“जुन्या प्रेमाला विसरायचं नसतं”; नितेश राणेंनी दिल्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या मुख्यमंत्र्यांना ‘खोचक शुभेच्छा’

मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद कोणत्या ना कोणत्या कारणाने होतच असतो. पण यावेळी नितेश राणे यांनी चक्क चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्हॅलेंटाइन डे निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नेहमी शिवसेनेवर टीका करणाऱ्या नितेश राणेंनी व्हिडीओ पोस्ट करत शिवसेना आमचे जुने प्रेम असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान वैभववाडी येथील भाजपाचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत हे आपले व्हॅलेंटाइन गिफ्ट असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. नितेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ पोस्ट केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतेच सिंधुदूर्ग दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर वैभववाडी येथील भाजपाचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले आहेत की, “मीदेखील बातमी वाचली आहे. व्हॅलेंटाइन डे काही दिवसांवर आला आहे. शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे. जुन्या प्रेमाला विसरायचं नसतं असं सगळे जण म्हणतात. वैभववाडीची परिस्थिती पाहिली तर येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारसुद्धा मिळणार नाही अशी शिवसेनेची परिस्थिती आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. बाळासाहेबांचा आम्ही काल आदर केला. आजही करतो आणि कायम करत राहू. आमच्या हृदयात बाळासाहेब आहेत. बाळासाहेबांच्या पक्षाची अवस्था अशी होऊ नये, अशी आमची भावना आहे. म्हणून हे सात नगरसेवक व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने उद्धवजींकडे पाठवतो आहे”.

“मेडिकल कॉलेजसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना सहीसाठी फोन केला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आमच्या मेडिकल कॉलेजच्या फाईलवर त्यांनी सही केली. आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही. त्यांना काही दिलं तरी ते घेणार नाहीत. पुष्पगुच्छही स्वीकारणार नाहीत, म्हणून हे सात नगरसेवक आम्ही आभार मानण्यासाठी पाठवत आहोत. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने उद्धवजींना आणि शिवसेनेला मनापासून शुभेच्छा देतो,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात