‘राजकारण करू नका, तुमची मदत वाढवा’; जिल्हाधिकाऱ्यांनी खडेबोल सुनावलेल्या ज्योती वाघमारे कोण आहेत?

Jyoti Waghmare : धुव्वाधार झालेल्या पावसाचा फटका मराठवाड्यासह अनेक भागांना बसला आहे. सोलापूरच्या सीना नदीला पूर आल्याने आसपासच्या गावांमध्ये पूराचे पाणी शिरले असून त्याचा मोठा फटका माळा, मोहोळ उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना बसला आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून येथील गावात जाऊन पाहणी केली जात आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे किंवा मदत मिळत नसल्याच्या कारणावरून संबंधित अधिकाऱ्यांना नेत्यांकडून फोन लावून झापलं जात असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आल्यानंतर आता चक्क जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेच्या नेत्या ज्योती वाघामारे यांना खडेबोल सुनावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ज्योती वाघमारे आणि पक्षाचे प्रमुख नेते सोलापूरमध्ये विविध ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप करत आहेत. या दरम्यान वाघमारे यांनी थेट सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून अपुरी मदत मिळत असल्याचा ठपका ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारे यांना आता राजकारण करण्याची वेळ नाही, तुमचं राजकारण नंतर करा, अशा शब्दांत सुनावलं आहे. या दोघांच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं काय झालं?
“साहेब, या गावाची लोकसंख्या खूप जास्त आहे, पण प्रशासनाकडून खूपच कमी संख्येत किट वाटप केले जात आहे, असं ज्योती वाघमारे म्हणाल्या. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, “आम्ही शक्य होईल तितकी मदत करत आहोत. तुम्ही सध्या त्या गावात आहात, तर तुम्ही किती किट आणल्या आहेत?” जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रश्नावर ज्योती वाघमारे नीट उत्तर देता आलं नाही.
कोण आहेत ज्योती वाघमारे?





