“शरद पवारांवर टीका करू नका, अन्यथा विधानसभा निवडणुकीला…”; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा

Sharad Pawar | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात भाजपच्या अधिवेशनात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. या सभेत शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरक्या असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला होता.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना दहा वर्षांचा हिशोब मागणाऱ्या शरद पवारांनी गेल्या 50 वर्षांत काय केले, महाराष्ट्र त्यांचा भार वाहतोय, असे म्हणत गृहमंत्री अमित शहा यांनी जळजळीत टीका केली. यावरून आता आजित पवार गटातील नेत्याने शरद पवार हे आमचं दैवत आहेत, त्यांच्याबद्दल बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही, असे स्पष्ट शब्दात भाजपला सुनावले आहे.
अजित पवार गटातील आमदार विलास लांडे यांनी भाजपला पत्र लिहून विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावर अशी टिप्पणी करू नये, अशी मागणी केली आहे. शरद पवार गेल्या 60 वर्षांपासून राजकारणात असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही, त्यांच्याबाबत असे वक्तव्य करणे योग्य नाही, शरद पवार हे आमचं दैवत आहेत, त्यांच्याबद्दल बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
पीएम मोदींच्या विधानाचा उल्लेख
विकास लांडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांसाठी ‘भटकती आत्मा’ असा शब्द वापरला होता. त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालात पक्षाला भोगावे लागले. शरद पवारांबद्दल जास्त न बोलता भाजपने आपली चूक सुधारावी, शरद पवारांवर टीका करण्याची चूक भाजपने पुन्हा पुन्हा करू नये, अन्यथा लोकसभेप्रमाणे आगामी काळातील विधानसभेतही भाजपला फटका बसू शकतो, असा इशारा विलास लांडेनी दिला. Sharad Pawar |
एकीकडे अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. Sharad Pawar |
हेही वाचा:
अभिनेत्री कंगना संतापली; म्हणाली,’अमेरिकन भारतीयांपेक्षा ‘मागास’…’





