Kangana Ranaut । बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत नेमीचं आपल्या विधानामुळे चर्चेत असते. अशात तिने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवरून पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. जो बिडेन यांनी यावेळी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या जागी कमला हॅरिस यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. या घोषणे पासून सोशल मीडियावर कमला हॅरिसवर अनेक मीम्स बनवले जात आहे.
एका मीममध्ये कमलाला कॉल गर्ल म्हटल्यावर यावरून कंगनाने संताप वायकर केले आहे. या मेममध्ये कमला हॅरिसचा फोटो असून त्यावर लिहिले आहे, ‘हा घोटाळा लक्षात ठेवा!!! सीए स्टेट स्पीकर विली ब्राउन हाय आणि कॉल गर्ल कमला हॅरिस 1994.’ असेही या मिम्समध्ये मनुंद केले आहे.
Entertainment News । काय म्हणाली कंगना ?
इन्स्टाग्राम स्टोरीवर हा मीम शेअर करताना कंगनाने संताप व्यक्त करत लिहिले की, ‘ज्यापासून बिडेनने हॅरिसला पोटससाठी पाठिंबा दिला, तेव्हापासून असे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. मी डेमोक्रॅट्सचे समर्थन करत नाही, परंतु अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या ॲटर्नी जनरल राहिलेल्या एका वृद्ध महिला राजकारण्यालाही लिंगभेदाचा सामना करावा लागत आहे हे विचित्र आहे.
Entertainment News । कंगनाने अमेरिकेतील लोकांना मागास म्हटले आहे…
‘खर सांगायचे तर या अमेरिकन लोकांना वाटते की, ते खूप आधुनिक आहे, पण प्रत्यक्षात ते खूप मागासलेले आहे. ते भारतीयांपेक्षा वाईट आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे.’ कंगनाची इन्स्टाग्राम स्टोरी दोषल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
कंगनाच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास,’कंगना मंडी (हिमाचल प्रदेश) येथील खासदार आहे आणि लवकरच तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटात माजी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा पीरियड ड्रामा चित्रपट ७ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.