Rahul Gandhi : घाबरू नका, सर्वकाही ठिक होईल.! राहुल गांधींनी घेतली काश्मीरमधील जखमींची भेट

Rahul Gandhi – संसदेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज (दि. २४) जम्मू आणि काश्मीरचा दौरा केला. त्यांनी पूंछ आणि श्रीनगरमध्ये पाकिस्तानी गोळीबारात जखमी झालेल्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पूंछमध्ये राहुल गांधी यांनी एका शाळेलाही भेट दिली आणि पाकिस्तानकडून सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारामुळे बाधित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आज पुंछ में पाकिस्तान की गोलाबारी में जान गंवाने वाले लोगों के परिवारों से मिला।
टूटे मकान, बिखरा सामान, नम आंखें और हर कोने में अपनों को खोने की दर्द भरी दास्तान – ये देशभक्त परिवार हर बार जंग का सबसे बड़ा बोझ साहस और गरिमा के साथ उठाते हैं। उनके हौसले को सलाम है।
पीड़ित… pic.twitter.com/CIDEXmqXxG
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 24, 2025
तुम्ही थोडा धोका आणि थोडी भयावह परिस्थिती पाहिली आहे, पण काळजी करू नका, सर्वकाही सामान्य होईल. या समस्येला तोंड देण्याचा तुमचा मार्ग म्हणजे कठोर अभ्यास करणे, खूप खेळणे आणि शाळेत भरपूर मित्र बनवणे हा आहे असे राहुल म्हणाले.
पाकिस्तानच्या गोळीबारात १२ वर्षांचे जैन अली आणि उर्वा फातिमा यांचा मृत्यू झाला. यांच्या एका मित्राशीही राहुल यांनी संवाद साधला. ७ ते १० मे दरम्यान झालेल्या हल्ल्याच्या वेळी शाळा गोळीबारातून बचावली असली तरी, त्यात २८ लोक ठार झाले आणि ७० हून अधिक जखमी झाले आहेत.
आज, पुंछ में पाकिस्तानी हमलों से प्रभावित मंदिर, गुरुद्वारा और मदरसे में गया।
यहां हर धर्म के लोग साथ रहते हैं, साथ दुख सहते हैं।
यही पुंछ है – यही हिंदुस्तान है, जहां सौहार्द है, एकता है, देशप्रेम है।
हमें बांटने और तोड़ने की कोशिश करने वाले कभी सफल नहीं होंगे – हम हमेशा… pic.twitter.com/MP1R9Ic1o9
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 24, 2025
दरम्यान, राहुल यांची शाळेत उपस्थिती पाहून विद्यार्थी उत्साहित दिसत होते. राहुल गांधी यांनी पूंछ येथील त्यांच्या दौऱ्यात गुरुद्वारा सिंह सभेला उपस्थिती लावली आणि शहीद अमरिक सिंग आणि अमरजीत सिंग यांच्या कुटुंबियांची, विशेषतः मुलांची भेट घेतली.
राहुल गांधींच्या पूंछ येथील दौऱ्यावर काँग्रेस खासदार आणि जम्मू-काश्मीरचे प्रभारी सरचिटणीस सय्यद नसीर हुसेन म्हणाले की, पाकिस्तानने ज्या प्रकारे नागरिकांवर हल्ला केला. त्यात १३ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. त्यामुळेच आज राहुल गांधी येथील लोकांना भेटले. राहुल गांधी यांनी येथे लवकर यावे अशी आमची इच्छा होती, परंतु परवानगी देण्यात येत नव्हती.





