करून दाखवलं.! ‘महाराष्ट्र शाहीर’नं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला…

मुंबई – ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनपटात त्यांच्या आयुष्यातील आणि व्यक्तिमत्वातील महत्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत. यापूर्वीच या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केली असून अंकुश चौधरीने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. सध्या सगळीकडे ‘महाराष्ट्र शाहीर’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. आणि त्यामुळे बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपटाने दमदार कमाईचा आकडा पार केला आहे.
चित्रपट पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये चांगलीच गर्दी करत आहेत. तर अभिनेता अंकुश चौधरीनं त्याच्या अभिनयानं सगळ्यांना भूरळ घातली. अनेकांनी तर तो अंकुश नव्हता ते शाहीर साबळे होते असं वाटल्याचं देखील सांगितलं.
चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 30 कोटींची कमाई केली आहे. तर शनिवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी विकेंड पाहता चित्रपटानं 55 लाख रुपयांची कमाई केली आहे. तर, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 3.33 कोटींची कमाई केली असल्याचं दिसून येत आहे.
शाहीर साबळेंभोवती फिरणारा महाराष्ट्रातला तो जूना काळ, त्यावेळीचे राजकारण, समाजकारण, संस्कृती, आपलं स्वत:चा संघर्ष आणि कुटुंब या सगळ्यांचा आढावा या चित्रपटातून फार अनोख्या पद्धतीनं घेण्यात आला आहे आणि हा प्रयत्न आता यशस्वी ठरला आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रासह सर्वत्र गाजतो आहे.





