डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; फोनवर झाली ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

Donald Trump’s wishes to Modi। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने देशासह जगभरातून पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत. तर शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याबद्दल मोदींनी देखील शोषलं मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. या फोनवरील संभाषणामध्ये युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी अमेरिकेने घेतलेल्या पुढाकारांना पंतप्रधान मोदींकडून पाठिंबा ही देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टमध्ये नेमकं काय ? Donald Trump’s wishes to Modi।
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी, “माझे मित्र, राष्ट्रपती ट्रम्प, माझ्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या फोन कॉलबद्दल आणि मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याप्रमाणेच, मी देखील भारत-अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारीला नव्या उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी तुमच्या पुढाकाराचे आम्ही समर्थन करतो.”असे त्यांनी म्हटले आहे.
Thank you, my friend, President Trump, for your phone call and warm greetings on my 75th birthday. Like you, I am also fully committed to taking the India-US Comprehensive and Global Partnership to new heights. We support your initiatives towards a peaceful resolution of the…
— Narendra Modi (@narendramodi) September 16, 2025
दोन्ही देशात सकारात्मक चर्चा ? Donald Trump’s wishes to Modi।
दरम्यान, भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील व्यापार करारावरील चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली असताना ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. मंगळवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. ही बैठक सुमारे सात तास चालली, जी दोन्ही देशांनी सकारात्मक असल्याचे वर्णन केले. अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे की, द्विपक्षीय व्यापार चर्चेवरील ही बैठक सकारात्मक होती.





