डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा उलटा खेळ! भारत-चीन व्यापारात सुधारणा, झाला मोठा फायदा

India – China Partnership | रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला यामुळे भारतीय व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भारतीय निर्यातदारांनी अमेरिकेच्या या निर्णयानंतर दुसऱ्या देशांच्या बाजाराची वाट धरली. मात्र असे चित्र असताना देखील याउलट ट्रम्प यांनाच मोठा धक्का बसला आहे.
कारण अमेरिकेच्या टॅरिफ दबावाच्या नितीमुळे भारत-चीन संबंध सुधारले आहेत. भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामिहन्यात भारतातून चीनला होणारी निर्यात 22 टक्क्यांनी वाढली आहे. चीनच्या भारताप्रती बदललेल्या सकारात्मक दृष्टिकोनाचा हा परिणाम असल्याचे दिसते.
भारताकडून चीनला 8.41 अब्ज डॉलरची निर्यात
अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफ लावण्याच्या निर्णयाचा झिंगा निर्यातीपासून टेक्सटाइल सेक्टरपर्यंत मोठा परिणाम दिसून आला. यात प्रामुख्याने टेलीफोन सेट, झिंगा, ॲल्युमिनियम आणि शिमला मिरचीसारख्या वस्तूंचा समावेश आहे. भारत-चीन व्यापारात सुधारणा झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2025 दरम्यान भारताने चीनला 8.41 अब्ज डॉलरची निर्यात केली.
मागच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामहिन्यात एप्रिल ते सप्टेंबर 2024 दरम्यान 6.90 अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. त्यात 22 टक्के वाढ दाखवली आहे. अमेरिकेच्या टॅरिफमुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या सेक्टर्समधील प्रोडक्ट्सना चीनमध्ये मोठी मागणी आहे. यात झिंगा आणि अॅल्युमिनियम प्रमुख आहेत. त्याशिवाय अन्य क्षेत्रातूनही चीनला होणाऱ्या निर्यातीत तेजी दिसून आली आहे. India – China Partnership |
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ आकारल्यानंतर भारतीय झिंगा निर्यातीवर सर्वाधिक वाईट परिणाम दिसून आला. ट्रम्प यांच्या टॅरिफ हल्ल्यानंतर भारतातून अमेरिकेच्या एअर कार्गो निर्यातीत 14 टक्के घसरण नोंदवली गेली. आंध्र प्रदेशच्या झिंगा इंडस्ट्रीला जवळपास 25000 हजार कोटींच नुकसान होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. अमेरिकेला निर्यात होणाऱ्या झिंग्याच्या 50 टक्के ऑर्डर 50 टक्के टॅरिफनंतर रद्द झाल्या असं सांगण्यात आले. त्याशिवाय अन्य प्रभावित सेक्टर्समध्ये अॅल्युमिनियम आणि टेक्सटाइल आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणानंतर, चीनच्या बाजारपेठेत भारताची निर्यात वाढणे हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा सकारात्मक बदल आहे. India – China Partnership |
चीनच्या राजदूतांची सोशल मिडिया पोस्ट
भारतातील चीनचे राजदूत श फीहोंग यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर एक पोस्ट करुन भारत-चीन व्यापार वाढल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामहिन्यात चीनला होणारी भारताची निर्यात 22 टक्क्याने वाढली. बीजिंग जास्तीत जास्त भारतीय वस्तुंचे स्वागत करतो. अमेरिकी टॅरिफचा प्रभाव कमी करण्यासाठी मदतीला तयार आहे,” असं श फीहोंग यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. India – China Partnership |
हेही वाचा:
‘तो’ फोन येताच केला आयुष्याचा शेवट; भारतीय महिला खेळाडूने उचललं टोकाचं पाऊल…





