डोनाल्ड ट्रम्पकडून आता सिनेसृष्टीवर करसंकट ; विदेशी चित्रपटांवर लादला १००% कर

Donald Trump Tax On Film । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला आतापर्यंत अनेक धक्के दिले आहेत . त्यांच्या धक्कातंत्रामुळे जगाला आर्थिक संकटाचा सामना सध्या करावा लागत आहे. हे असे सगळे सुरु असताना ट्रम्प यांनी आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यांनी आता टॅरिफच्या सध्या सुरू असलेल्या मुद्द्यात चित्रपट उद्योगाचाही समावेश केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर १०० टक्के कर लादला आहे. याचा थेट परिणाम हॉलिवूडवर होऊ शकतो. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मोठी माहिती दिली. याबाबतची एक पोस्ट ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये,”अमेरिकेतील चित्रपट उद्योग खूप वेगाने मरत आहे. इतर देश आपल्या चित्रपट निर्मात्यांना आणि स्टुडिओना अमेरिकेपासून दूर नेण्यासाठी विविध प्रोत्साहन योजना देत आहेत. हॉलिवूड आणि अमेरिकेतील इतर अनेक क्षेत्रे उद्ध्वस्त होत आहेत. हा इतर देशांचा सुनियोजित प्रयत्न आहे आणि म्हणूनच तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे.” असे म्हटले आहे.
The Movie Industry in America is DYING a very fast death. Other Countries are offering all sorts of incentives to draw our filmmakers and studios away from the United States. Hollywood, and many other areas within the U.S.A., are being devastated. This is a concerted effort by…
— Donald J. Trump Posts From His Truth Social (@TrumpDailyPosts) May 4, 2025
अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर १०० टक्के कर लादला Donald Trump Tax On Film ।
या शुल्काबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी, “मी वाणिज्य विभाग आणि अमेरिकन व्यापार प्रतिनिधींना परदेशात उत्पादित आणि आपल्या देशात आयात केलेल्या सर्व चित्रपटांवर १००% शुल्क लादण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे अधिकार देतो.” आम्हाला पुन्हा अमेरिकेत चित्रपट बनवायचे आहेत!” असे सांगितले आहे.
हॉलिवूडवर टॅरिफचा मोठा परिणाम होईल Donald Trump Tax On Film ।
ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफ निर्णयाचा थेट परिणाम हॉलिवूडवर होणार आहे. हॉलिवूडमध्ये बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांना आता जास्त खर्च करावा लागू शकतो. ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की परदेशात बनणाऱ्या चित्रपटांमुळे अमेरिकेचे नुकसान होत आहे.





